रस्ता चोरीला जातो तेंव्हा़़़
By Admin | Updated: November 23, 2014 00:26 IST2014-11-22T23:42:51+5:302014-11-23T00:26:09+5:30
सोमनाथ खताळ, बीड रस्त्यावर बांधकामे करून रस्ते ढापण्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे़ कागदावर १०० फूट असलेला रस्ता आता केवळ १० फूट राहिला आहे़

रस्ता चोरीला जातो तेंव्हा़़़
सोमनाथ खताळ, बीड
रस्त्यावर बांधकामे करून रस्ते ढापण्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे़ कागदावर १०० फूट असलेला रस्ता आता केवळ १० फूट राहिला आहे़ त्यामुळे रस्ता चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे़ अप्पर सचिवांनी या प्रकरणाची दखल घेऊन पालिकेला आदेश दिले़ मात्र या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली़ त्यामुळे अधिकारी व अतिक्रमणधारकांचे साटेलोटे उघड झाले आहे़
शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेले आहेत़ हे बांधकाम करताना पालिकेकडून परवाना घेतला जातो़ मात्र हा परवाना जागेची पाहणी न करताच पालिकेकडून दिला जात आहे. त्यामुळे बेकायदेशीर बांधकाम करून जागा ढापण्याचे काम केले जात आहे. बेकायदेशीर बांधकाम करणारांचे हात बळकट करण्याचे काम नगर रचना विभागातील अधिकारीच करीत असल्याचा अरोप सामाजिक कार्यकर्ते ललीत अब्बड यांनी केला आहे.
शहरातील जालना रोडहून तरफमाळी भागातून कृष्ण मंदिराकडे रस्ता जातो. या रस्त्यावर सध्या पालिकेकडूनच पाच ते दहा फूट खोल नाल्या खोदल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता अरूंद झाला आहे.
पालिकेने केला होता प्रस्ताव
रस्ता ३० मिटरऐवजी ९ मिटर करावा, असा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र हा प्रस्ताव नस्तिबद्ध करण्यात आला होता. हा रस्ता मोठा होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती. संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या रस्त्याचे तीनतेरा झाले
चौकशी करून कारवाई
या रस्त्याची मी स्वत: चौकशी करतो. हा मुद्दा लक्षात घेऊन मी चौकशी करतो, आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसींग यांनी सांगितले.