स्मार्ट सिटी बसतर्फे रस्ते सुरक्षा सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:05 IST2021-01-19T04:05:46+5:302021-01-19T04:05:46+5:30
फोस्टर महाविद्यालय मनपाने केले सील औरंगाबाद : महानगरपालिकेच्या पथकाने सोमवारी थकीत मालमत्ता करासाठी शिवाजीनगर येथील फोस्टर महाविद्यालयाचे मुख्य कार्यालय, ...

स्मार्ट सिटी बसतर्फे रस्ते सुरक्षा सप्ताह
फोस्टर महाविद्यालय मनपाने केले सील
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या पथकाने सोमवारी थकीत मालमत्ता करासाठी शिवाजीनगर येथील फोस्टर महाविद्यालयाचे मुख्य कार्यालय, तीन प्रवेशद्वार सील केले. महाविद्यालयाकडे १३ लाख ९३ हजार रुपये कर थकला होता. वाॅर्ड अधिकारी महावीर पाटणी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
रेल्वे स्टेशन, विमानतळावर १७८ प्रवाशांची तपासणी
औरंगाबाद : दिल्लीहून सचखंड एक्स्प्रेसने शहरात दाखल झालेल्या १३०, तसेच विमानतळावर ४८ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. जाधववाडी भाजी मंडईत ११ नागरिकांची तपासणी केली. जाफरगेट आठवडी बाजारात रविवारी ७, तर सोमवारी पीरबाजार येथील आठवडी बाजारात ६ जणांची तपासणी केली.
महापालिकेचे विद्यार्थी पुणे कार्यशाळेसाठी रवाना
औरंगाबाद : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनद्वारा आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज २०२१ अंतर्गत १०० उपग्रह तयार करून दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम येथून अवकाशात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या प्रक्षेपणाच्या पूर्वतयारीसाठी पुणे येथे १९ जानेवारी २०२१ रोजी कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेसाठी औरंगाबाद मनपा शाळेतील दहा विद्यार्थी निघाले आहेत. या विद्यार्थ्यांना मनपाकडून प्रवासाची कीट देण्यात आली.
दिवसभरात ९०१ नागरिकांची तपासणी
औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सोमवारी शहरात ९०१ नागरिकांची तपासणी केली. अँटिजेन पद्धतीने १९९ जणांची तपासणी केली असता, त्यामध्ये दहाजण पॉझिटिव्ह आढळून आले. ७०२ नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले.