स्वखर्चातून नेवपूर माळरानावरील रस्ता दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:02 IST2021-08-28T04:02:26+5:302021-08-28T04:02:26+5:30

नेवपूर येथील दलित नागरिकांना माळरानावर इनामी जमिनी देण्यात आलेल्या आहेत. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने जाण्या-येण्यासाठी मोठा त्रास ...

Road repair on Nevpur Malrana at his own cost | स्वखर्चातून नेवपूर माळरानावरील रस्ता दुरुस्ती

स्वखर्चातून नेवपूर माळरानावरील रस्ता दुरुस्ती

नेवपूर येथील दलित नागरिकांना माळरानावर इनामी जमिनी देण्यात आलेल्या आहेत. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने जाण्या-येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. शेतीसाठी लागणारे साहित्य, बी-बियाणे खते डोक्यावर घेऊन डोंगर चढावा लागत होता. येथील नागरिकांनी जिल्हा बँकेचे संचालक डॉ. मनोज राठोड यांच्याकडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यांनी नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत तत्काळ स्व:खर्चाने कामाला सुरुवात केली.

यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख राहुल वळवळे, सरपंच मनोज देशमुख, सरपंच भारत आवारे माजी सरपंच दीपक देवकर, किशोर चोतमल, उपसरपंच गिरधर कोतकर, आदी उपस्थित होते.

फोटो : नेवपूर येथील माळरानावर जाणाऱ्या रस्ता कामाचा प्रारंभ करण्यात आला.

260821\250820210825_105553.jpg

नेवपूर येथील माळरानावर जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा दुरूस्तीचा शुभारंभ करताना डॉ.मनोज राठोड ,संजय आबा देशमुख, मनोज देशमुख, दीपक देवकर   आदी....छाया प्रशांत सोळुंके

Web Title: Road repair on Nevpur Malrana at his own cost