रस्ते विकास महामंडळाचे कार्यालय एमआयडीसीमध्ये

By Admin | Updated: October 26, 2016 01:01 IST2016-10-26T00:47:39+5:302016-10-26T01:01:08+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंत्यांच्या आवारातील कार्यालय चिकलठाणा एमआयडीसीमध्ये स्थलांतर झाले आहे.

Road Development Corporation's office at MIDC | रस्ते विकास महामंडळाचे कार्यालय एमआयडीसीमध्ये

रस्ते विकास महामंडळाचे कार्यालय एमआयडीसीमध्ये


औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंत्यांच्या आवारातील कार्यालय चिकलठाणा एमआयडीसीमध्ये स्थलांतर झाले आहे. कार्यालय कुठे गेले, त्याचा पत्ता काय, याची कुठलीही माहिती महामंडळाने जुन्या कार्यालयावर डकविलेली नाही. त्यामुळे कार्यालयीन व इतर कामांसाठी येणाऱ्यांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे. तेथे नियुक्त करण्यात आलेले कर्मचारीही जागेवर नसल्यामुळे कार्यालयाच्या स्थलांतरणाची माहिती कुणीही देण्यास उपलब्ध नाही.
नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम एमएसआरडीसी करणार आहे. तसेच शहरातील रेल्वेस्टेशन, जालना रोडवरील उड्डाणपुलांची देखभाल दुरुस्ती एमएसआरडीसीकडे आहे. तसेच आता औरंगाबाद ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी देखील एमएसआरडीसीकडे डीपीआर बनविण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे हे कार्यालय आता खऱ्या अर्थाने पब्लिक सेक्टरमध्ये आले आहे.
जुने कार्यालय अपुरे पडत असल्यामुळे चिकलठाणा एमआयडीसीतील गरवारे स्टेडियम समोरील इमारतीत हलविण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांनी सांगितले.
नवीन कार्यालयामध्ये संचालक, भूसंपादनासाठी नियुक्त अधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंत्यांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांना पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: Road Development Corporation's office at MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.