कटकटगेटला दोन्ही बाजूने रस्ता

By Admin | Updated: September 26, 2016 00:35 IST2016-09-26T00:23:23+5:302016-09-26T00:35:23+5:30

औरंगाबाद : ऐतिहासिक कटकटगेटच्या दोन्ही बाजूने रस्ता करण्यासाठी मागील काही वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर या उपक्रमाला मुहूर्त सापडला

The road on both sides of Cuttackgate | कटकटगेटला दोन्ही बाजूने रस्ता

कटकटगेटला दोन्ही बाजूने रस्ता

औरंगाबाद : ऐतिहासिक कटकटगेटच्या दोन्ही बाजूने रस्ता करण्यासाठी मागील काही वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर या उपक्रमाला मुहूर्त सापडला असून, २८ सप्टेंबर रोजी पाकलमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते कटकटगेटच्या मार्गासाठी करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. महापालिकेने गेटच्या दोन्ही बाजूने रस्त्यात बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना तातडीने टीडीआर प्रदान केले आहेत.
शहरात पूर्वी ५२ दरवाजे होते. आता बोटावर मोजण्याएवढेच दरवाजे शिल्लक राहिले आहेत. कटकटगेट येथे मागील अनेक वर्षांपासून दरवाजाच्या आतून वाहतूक सुरू आहे. वाहतुकीमुळे दरवाजाचे आयुष्य कमी होत असल्याचे इतिहास तज्ज्ञांचे मत होते. गेटच्या दोन्ही बाजूने रस्ता करावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. शहरातील काही दरवाजांच्या दोन्ही बाजूने वाहतूक वळविण्यात आली आहे. कटकटगेटसाठी मनपाकडे पुरेसा निधी नव्हता. पालकमंत्री रामदास कदम यांनी डीपीडीसीमधून २ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली. पहिला टप्प्यात मनपाला ५० लाखांचा निधीही प्राप्त झाला. मात्र, रस्त्यासाठी दोन्ही बाजूने ३० फूट रुंद रस्ता करायचा होता. पालकमंत्री रामदास कदम यांचा या कामासाठी सतत पाठपुरावा सुरू होता. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी युद्धपातळीवर हे काम करण्याचे आदेश दिल्यामुळे मनपाच्या नगररचना विभागाने सर्वेक्षण केले. रस्त्यात एकूण ११ मालमत्ता बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. सर्व मालमत्ताधारकांशी चर्चा करण्यात आली. मोबदला किंवा टीडीआर देण्याचे मनपातर्फे सांगण्यात आले. ६ मालमत्ताधारकांनी टीडीआर घेण्यास सहमती दर्शविली. त्यांचे रीतसर प्रस्तावही नगररचना विभागात दाखल करण्यात आले. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने ५ टीडीआर मंजूर केले. एका मालमत्ताधारकाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. एका मालमत्ताधारकाला एफएसआय वाढवून हवा आहे. उर्वरित मालमत्ताधारकांनी मोबदला मागितला तर त्यांना मोबदलाही देण्याची तयारी मनपा प्रशासनाने दर्शविली आहे.

Web Title: The road on both sides of Cuttackgate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.