रस्ता ६० फुटाचा होणार!
By Admin | Updated: July 18, 2014 01:51 IST2014-07-18T00:59:55+5:302014-07-18T01:51:06+5:30
राजेश गंगमवार, बिलोली देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा ते बिलोलीमार्गे धर्माबाद-मुधोळ या राज्य मार्गाचे रुंदीकरण सुरू होणार असून मराठवाडा-तेलंगणा जोडणाऱ्या अन्य दुसऱ्या मार्गाचे ६० फुटात रुपांतर होईल़

रस्ता ६० फुटाचा होणार!
राजेश गंगमवार, बिलोली
देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा ते बिलोलीमार्गे धर्माबाद-मुधोळ या राज्य मार्गाचे रुंदीकरण सुरू होणार असून मराठवाडा-तेलंगणा जोडणाऱ्या अन्य दुसऱ्या मार्गाचे ६० फुटात रुपांतर होईल़ दरम्यान, मार्गावरील मोजणी व अतिक्रमण व सध्या परिस्थितीबाबत महिनाअखेर पाहणी केली जाणार आहे़ तीर्थक्षेत्र बासरसाठी हा प्रमुख मार्ग होय़
महाराष्ट्र राज्य रस्ता विकास योजनेतून खानापूर फाटा जो नांदेड-देगलूर-बीदर मार्गावर जोडलेला आहे, तेथून आदमपूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद ते बिद्राळी (मुधोळ) फाटा असा १४१़७० किलोमीटरचा प्रस्ताव मंजूर झाला आहे़ राज्य महामार्गाअंतर्गत बिलोली, कुंडलवाडी व धर्माबाद या तीन शहरातील पालिकांचा संबंध येतो़ संपूर्ण रस्ता तिन्ही शहरांच्या मधोमध गेलेला आहे़ याच अनुषंगाने ६० फुट रस्ता रुंदीकरणाबाबत तिन्ही पालिकांना राज्य रस्ता विकास विभागाने गुरुवारी कळविले आहे़ बिलोली शहरातून नांदेड-हैदराबाद महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना आता कुंडलवाडीकडे जाणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण लवकरच सुरू होणार आहे़ रोड प्रोजेक्ट विभागाअंतर्गत पालिकांना सूचित करण्यात आल्याने पुढच्या आठवड्यातच ६० फुट व दुतर्फा नाली अशी मार्कींग केली जाणार आहे़ यापूर्वी तीर्थखेत्र बासरसाठी रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव होताच़ तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास अंतर्गत प्रमुख मार्ग म्हणून नोंद झाली़ रस्ता रुंदीकरणामुळे तीनही शहरातील मार्गावर येणारे अडथळे, अतिक्रमण काढून टाकण्यात येईल.