रिव्हॉल्व्हरचा धाक; २० लाखांची खंडणी

By Admin | Updated: June 29, 2016 01:08 IST2016-06-29T00:33:49+5:302016-06-29T01:08:11+5:30

औरंगाबाद : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीविरुद्ध छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rival of the Revolver; 20 lakhs ransom | रिव्हॉल्व्हरचा धाक; २० लाखांची खंडणी

रिव्हॉल्व्हरचा धाक; २० लाखांची खंडणी


औरंगाबाद : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीविरुद्ध छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडेगाव येथील मारुती मंदिराजवळ ही घटना घडली. सय्यद मुजीब सय्यद मैनोद्दीन (रा. अन्सार कॉलनी), असे आरोपीचे नाव आहे.
जनार्दन विश्वासराव मावस्कर (३६, रा. भावसिंगपुरा) यांनी आपल्या मालकीच्या शेतीची दोन महिन्यांपूर्वी विक्री केली होती. जमीन विक्रीच्या व्यवहारातून त्यांना चांगला पैसा मिळाल्याची माहिती सय्यद मुजीब याला समजली होती. जमीन विक्रीतून मिळालेल्या पैशातून आपणास २० लाख रुपयांची खंडणी द्यावी, अशी मागणी तो सातत्याने करीत होता; परंतु मावस्कर यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
दोन दिवसांपूर्वी सय्यद मुजीब याने मावस्कर यांना पडेगाव येथील मारुती मंदिराजवळ रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अडविले.

Web Title: Rival of the Revolver; 20 lakhs ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.