शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना टाइप- २ मधुमेहाचा धोका; कारण काय? लक्षणे कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 18:50 IST

वजन जास्त असल्याने शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्यप्रकारे प्रतिसाद देत नाहीत, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

छत्रपती संभाजीनगर : एखाद्या समारंभात ‘मी गोड खाणे बंद केले आहे, शुगर आहे,’ असे कोणाकडून तरी हमखास ऐकण्यात येते. महिलांना टाइप-२ मधुमेहाचा धोका असतो. विशेषत: जास्त वजन असल्यास हा धोका अधिक असतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासह आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात केली पाहिजे, असा सल्ला मधुमेहतज्ज्ञांनी दिला.

काय आहे टाइप- २ मधुमेह?रक्तातील साखरेचे प्रमाण जेव्हा मर्यादेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा त्यास मधुमेह म्हणतात. टाइप- २ मधुमेह हा अयोग्य जीवनशैलीमुळे होतो. यात शरीरात इन्सुलिनचे काम नीट होत नाही व इन्सुलिनचा स्राव कमी प्रमाणात होतो.

कारणे काय?वजन जास्त असल्याने शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्यप्रकारे प्रतिसाद देत नाहीत, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. अनियमित आहार, जास्त प्रमाणात साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन, तसेच शारीरिक व्यायामाचा अभाव हे मधुमेहाचे जोखमीचे घटक आहेत. अनुवांशिकता, कमी झोप, उच्च रक्तदाब आदींमुळेही टाइप-२ मधुमेह होतो.

लक्षणे काय?वारंवार लघवीस जावे लागणे, मूत्रमार्गावर जंतुसंसर्ग होणे, खूप भूक लागणे, वजन कमी होणे, जखम बरी न होणे, अंगाला खाज येणे आदी लक्षणे टाइप-२ मधुमेहात दिसतात. मधुमेहामुळे गर्भावस्थेत गुंतागुंत होऊ शकते. मधुमेहामुळे बाळाची नीट वाढ न होणे, रक्तदाब वाढणे, बाळाचे वजन जास्त झाल्यामुळे सिझेरियन करावे लागणे इत्यादी त्रास होऊ शकतात.

काय काळजी घ्याल?महिलांनी स्वतःचे आरोग्य टिकवून ठेवण्याची त्रिसूत्री म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार. रक्तातील लोहाचे, जीवनसत्त्वांचे व इतर घटकांचे (आयोडिन, मग्नेशिअम, कॅल्शिअम) प्रमाण योग्य राहण्यासाठी सर्व पालेभाज्या, मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी, डाळी, ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या फळभाज्या, परवडणारी फळे, सुकामेवा, दूध यांचा आहारात समावेश असावा.

योग्य जीवनशैली हवीमहिलांनी योग्य जीवनशैली आत्मसात करून शक्यतो आरोग्याच्या समस्या होऊ न देणेच चांगले. झाल्यास त्या लवकरात लवकर नियंत्रित करणे गरजेचे आहे. उष्मांक वापरून होणारे व्यायाम जसे की, चालणे, पळणे, खेळणे इत्यादी रोज साधरणत: चाळीस मिनिटे करावे. त्यानंतर योगासने व प्राणायम करावा. मांसपेशींना बळकट करणारे व्यायाम आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस करावेत.- डॉ. मयुरा काळे, अध्यक्ष, मधुमेहतज्ज्ञ संघटना, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादdiabetesमधुमेहHealthआरोग्य