राज्य टेबल टेनिस स्पर्धेत ऋषिकेशला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 01:00 IST2018-06-11T01:00:00+5:302018-06-11T01:00:38+5:30

पुणे येथे नुकत्याच झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या ऋषिकेश जगताप याने मुलांच्या १0 वर्षांखालील वयोगटात उपविजेतेपद पटकावले. ही स्पर्धा ५ ते १0 जूनदरम्यान झाली. ऋषिकेश जगताप याने उपउपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या अथर्व साळवीचा ३-0 असा पराभव केला.

Rishikesh will be the runner-up in the state table tennis tournament | राज्य टेबल टेनिस स्पर्धेत ऋषिकेशला उपविजेतेपद

राज्य टेबल टेनिस स्पर्धेत ऋषिकेशला उपविजेतेपद

औरंगाबाद : पुणे येथे नुकत्याच झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या ऋषिकेश जगताप याने मुलांच्या १0 वर्षांखालील वयोगटात उपविजेतेपद पटकावले. ही स्पर्धा ५ ते १0 जूनदरम्यान झाली.
ऋषिकेश जगताप याने उपउपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या अथर्व साळवीचा ३-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याने मुंबई शहरच्या आर्यनवर ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवताना उपांत्य फेरी गाठली. ऋषिकेश जगताप याने पुण्याच्या सोमन शोरेन याच्यावर ३-२ अशी मात करीत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत मात्र त्याला नांदेडच्या कौस्तुभ गिरगावकर याच्याकडून ३-0 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ऋषिकेशला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऋषिकेश जगताप याला हर्ष जैस्वाल आणि राज जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल औरंगाबाद जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष किरण वाढी, सचिव कुलजितसिंग दरोगा, नरेश छाजेड, प्रवीण भुजबळ, उमेश ठक्कर, नीलेश मित्तल आणि संघटनेचे पदाधिकारी, तसेच खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Rishikesh will be the runner-up in the state table tennis tournament

टॅग्स :