पाटोद्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ

By Admin | Updated: January 31, 2017 00:20 IST2017-01-31T00:16:47+5:302017-01-31T00:20:47+5:30

पाटोदा : शहरातील पेठ भागात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ८ ते १० दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत चार दुकाने फोडली.

The rioters in Patoda | पाटोद्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ

पाटोद्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ

पाटोदा : शहरातील पेठ भागात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ८ ते १० दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत चार दुकाने फोडली. यावेळी चोरांनी सीसी टीव्हीचे वायर तोडून तीन सराफा दुकाने व एका जनरल स्टोअर्स फोडून ३ किलो चांदीसह रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. पोलिसांनी बेवारस कार जप्त केली आहे.
८ ते १० जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने सर्वप्रथम बापूराव बनकर यांचे गणेश ज्वेलर्स, गणेश बेदरे यांचे मोरेश्वर ज्वेलर्स आणि आनंदकुमार संचेती यांचे आनंद ज्वेलर्स या तीन दुकानांत हात साफ करीत ३ किलो चांदी व रोख १० हजार रुपये चोरले. त्यानंतर पी.डी. जायभाये यांच्या राजलक्ष्मी जनरल स्टोअसमध्येही डल्ला मारला. तिजोरी फोडण्यात दरोडेखोरांना अपयश आल्याने व दोन दुकानांचे शटरच्या आतील गेट न उघडल्यामुळे ही दुकाने वाचली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. श्वानपथकाला यावेळी पाचारण करण्यात आले होते. या घटनांमुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, सराफा दुकानातील सीसीटीव्हीचे वायर तोडण्याआधी चोरटे फुटेजमध्ये दिसत आहेत. ते फुटेजही ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)

Web Title: The rioters in Patoda