जातीवाचक शिविगाळ केल्याने सश्रम कारावास

By Admin | Updated: May 24, 2014 01:37 IST2014-05-24T01:30:42+5:302014-05-24T01:37:38+5:30

लातूर : शेतीच्या बांधावरुन लातूर तालुक्यातील कव्हा येथील एका मागासवर्गीय महिलेस जातीवाचक शिविगाळ

Rigorous imprisonment for rigorous imprisonment | जातीवाचक शिविगाळ केल्याने सश्रम कारावास

जातीवाचक शिविगाळ केल्याने सश्रम कारावास

लातूर : शेतीच्या बांधावरुन लातूर तालुक्यातील कव्हा येथील एका मागासवर्गीय महिलेस जातीवाचक शिविगाळ करणार्‍यास लातूर येथील पहिले तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या़ एम़ एम़ पोतदार यांनी विविध पाच कलमांन्वये सक्तकारावासासह दंडाची शिक्षा सुनावली आहे़ लातूर तालुक्याती कव्हा येथील वैजू उर्फ अशोक खंडागळे यांच्या शेतातील बंधार्‍यावरुन शोभाबाई राजाभाऊ होळकर यांच्या शेताला जाण्यासाठी रस्ता आहे़ २८ एप्रिल २०१२ रोजी दुपारी शोभाबाई होळकर ह्या मुलगी अपेक्षा हिच्यासोबत या बांधावरुन शेताहून परतत होत्या़ तेव्हा वैजू खंडागळे याने त्या दोघींना पाहून शीळ घातली़ तेव्हा होळकर यांनी विचारणा केली असता जातीवाचक शिवीगाळ केली़ सायंकाळी त्यांचे पती घरी आल्यानंतर त्यांनी दुपारी घडलेल्या घटनेची माहिती दिली़ त्यांच्या पतीने सुरुवातीस तंटामुक्ती समितीकडे तक्रार दिली़ मात्र तिथे हा प्रश्न सुटला नाही़ त्यामुळे त्यांनी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला़ या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी न्यायालयात आरोपी खंडागळे याच्याविरुध्द आरोपपत्र दाखल केले़ याप्रकरणी न्यायालयात सात साक्षीदारांच्या जबानी नोंदविण्यात आल्या़ न्या़ पोतदार यांनी प्रत्यक्षदर्शी, साक्षीदारांच्या जबानी व कागदोपत्री पुरावा ग्राह्य धरुन आरोपी वैजू खंडागळे यास सहा महिने सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावास सुनावला़ तसेच विविध पाच कलमांनुसार दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे़ याप्रकरणी फिर्यादीच्या बाजूने सहाय्यक जिल्हा सरकारी वकील डी़ एऩ भालेराव यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)

Web Title: Rigorous imprisonment for rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.