शहर विकासासाठी प्रसंगी कठोर निर्णय

By Admin | Updated: November 16, 2014 00:37 IST2014-11-16T00:25:50+5:302014-11-16T00:37:19+5:30

लातूर : लातूर शहरातील स्वच्छतेच्या कामाला आपले पहिले प्राधान्य राहिल़ मनपाचे उत्पन्न वाढावे, नागरिकांच्या समस्यांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा यासाठी

Rigorous decision on the occasion of development of the city | शहर विकासासाठी प्रसंगी कठोर निर्णय

शहर विकासासाठी प्रसंगी कठोर निर्णय



लातूर : लातूर शहरातील स्वच्छतेच्या कामाला आपले पहिले प्राधान्य राहिल़ मनपाचे उत्पन्न वाढावे, नागरिकांच्या समस्यांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची दरमहा बैठक घेतली जाईल़ लातूरकरांच्या सेवेत कुठेही कमी पडणार अशी ग्वाही नूतन महापौर अख्तर शेख व उपमहापौर कैलास कांबळे यांनी ‘लोकमत’ कार्यालयात दिली़
नूतन महापौर अख्तर शेख व उपमहापौर कैलास कांबळे यांनी लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट देवून संवाद साधला़ यावेळी महापौर अख्तर शेख म्हणाले, २१ तारखेला आम्ही पदभार घेणार आहोत़ त्यानंतर विविध कामे हाती घेण्यात येतील़ बांधकाम परवाने बंद आहेत़ ते तात्काळ चालू केले जातील़ चुकीच्या पद्धतीने झालेली बांधकामे, प्रॉपर्टीची गणना करण्यासाठी तज्ज्ञ एजन्सीची नेमणूक केली जाईल़ मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे़ उत्पन्न वाढीसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील़ कर्मचाऱ्यांचा पगार, नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी उत्पन्न वाढ व स्वच्छतेवर आपले प्रमुख लक्ष आहे़ मुख्य बाजारपेठेसह अन्य ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक शौचालये उभारणार, असेही त्यांनी सांगितले़
माजी मंत्री आ़दिलीपराव देशमुख, माजीमंत्री आ़ अमित देशमुख यांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू, असे नूतन महापौर शेख व उपमहापौर कांबळे यांनी सांगत ‘रबर स्टँप’चा शिक्का पुसून काढू.
४ग्रीन बेल्टच्या जागांवर बागा उभारण्यात येतील़ शहराच्या कचऱ्याचा प्रश्न सुटलेला आहे़ तरीही कचरा डेपोसाठी जागेला प्राधान्य देण्यात येईल़ अनधिकृत असलेली बांधकामे अधिकृत करून घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेवून मनपाच्या तिजोरीत कशी भर पडेल, यावरही विचार सुरू आहे़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे़ भंडारवाडी प्रकल्पातून पाणी योजना सुरू करण्यात येत आहे़ लिंबोटी धरणावरूनही पाणी आणण्यासाठी निधी मंजूर झाला आहे़ जुन्या काळातील पाईपलाईनमुळे अनेक भागात पाणी पोहोचत नाही़ यावरही उपाययोजना करण्यात येतील़ गंजगोलाईतील टपरी धारकांचे पुनर्वसन, वाहनांची पार्किंग आदी सुविधा पुरविण्याकडे लक्ष दिले जाईल, असे उपमहापौर कैलास कांबळे म्हणाले़
आपली निवड फक्त दहा महिन्यासाठीच झाली असल्याचे सांगितले जाते यावर उपमहापौर कांबळे यांनी पाच दिवसाचे क्रिकेट टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटीवर आले आहे. तसे राजकारणातही होऊ शकते. परंतु आम्ही इतके चांगले काम करु की पक्षश्रेष्ठी आम्हालाच मुदतवाढ देतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कर्मचारी आणि अधिकारी मिळून काम करणार असल्याचे सांगत कामचुकार अधिकाऱ्यांवर दंडुका उगारण्याचे संकेतही महापौैर आणि उपमहापौैरांनी दिले.

Web Title: Rigorous decision on the occasion of development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.