शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

'हरित' महाराष्ट्रासाठी पुढचे पाऊल; राज्यातील रिक्षा आता ‘सोलार’वर धावणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 18:05 IST

महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यात रिक्षाचालक, मालकांवर मोठे संकट कोसळले होते. या संकटाला तोंड देत आता त्यांचा उदरनिर्वाह पूर्ववत होत आहे. सरकारने लॉकडाऊनमध्ये ७ लाखांहून अधिक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये दिले. वाढत्या इंधन दरवाढीमुळे रिक्षाचालक वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठे पाऊल उचलले. राज्यातील काही रिक्षा सोलार एनर्जीवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. पायलट प्रोजेक्ट म्हणून पुणे, औरंगाबादेत काही रिक्षा सोलारमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. मात्र, भाड्यात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले. त्यातच लॉकडऊनमुळे अनेक रिक्षाचालक, मालकांचे आर्थिकरीत्या कंबरडे मोडले. पोटाची खळगी कशी भागवावी, असा प्रश्नही आजही त्यांना भेडसावतोय. रिक्षाचालकांसाठी काहीतरी ठोस केले पाहिजे ही कल्पना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षाचालकांना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. रिक्षाचालकांच्या बँक खात्यात १०७ कोटी रुपये जमाही करण्यात आले.

पेट्रोल-डिझेलवरील रिक्षा आता परवडत नाहीत. दिवसभर मेहनत करूनही १०० ते २०० रुपयेही शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे सरकारने राज्यातील काही रिक्षा सोलारवर चालविण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी येणारा खर्च राज्य शासन काही प्रमाणात उचलणार आहे. रिक्षाचालकांना काही भार उचलावा लागेल. त्यातही सबसिडी दिली जाईल. कायमस्वरूपी रिक्षा सोलारवर धावणार आहे. हवेचे प्रदूषण कमी करण्यातही मोठा हातभार लागेल, असे शासनाला वाटत आहे.

औरंगाबाद, पुण्याची निवडऔरंगाबाद शहरात साधारणपणे १३ हजारांपेक्षा अधिक रिक्षा रेकॉर्डवर आहेत. त्यातील किमान ५ हजार रिक्षा सोलारवर चालविण्याचा मानस आहे. पुणे शहरात रिक्षांची संख्या ८७ हजारांहून अधिक आहे. त्यातील १४ हजारांहून अधिक रिक्षा सोलारवर करण्यात येतील. हा पायलट प्रोजेक्ट आहे. सध्या पेट्रोल-डिझेलवर जेवढे प्रवासी नेता येतात तेवढेच प्रवासी सोलारवरही नेता येतील. रिक्षाची वहन क्षमता कमी होणार नाही.- आस्तिककुमार पाण्डेय, सीईओ स्मार्ट सिटी, औरंगाबाद.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्र