दोन बहिणींना घेऊन रिक्षाचालकाची धूम
By Admin | Updated: November 3, 2016 01:30 IST2016-11-03T01:26:16+5:302016-11-03T01:30:04+5:30
परळी : दोन सख्ख्या बहिणींना रिक्षावाल्याने पळवून नेल्याची घटना मंगळवारी मिरवट येथे उघडकीस आली.

दोन बहिणींना घेऊन रिक्षाचालकाची धूम
परळी : दोन सख्ख्या बहिणींना रिक्षावाल्याने पळवून नेल्याची घटना मंगळवारी मिरवट येथे उघडकीस आली. याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
भरत रामदास कांदे (रा. जिरेवाडी ता. परळी) असे आरोपीचे नाव आहे. तो प्रवासी रिक्षा चालवतो. तीन मुलांचा पिता असलेल्या भरतचे मिरवटला प्रवासी ने- आण करण्यासाठी येणे- जाणे असायचे. मजूर कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींना त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांना राहत्या घरून त्याने पळवून नेले. त्यापैकी एक अल्पवयीन आहे.
या मुली, आईसोबत घरात होत्या. आईला दुपारच्या वेळी डुलकी लागताच त्यांनी धूम ठोकली. अपहृत बहिणींसह अपहरणकर्त्याचा शोध सुरू असल्याचे सहायक निरीक्षक बी. बी. नाईकवाडे यांनी सांगितले. (वार्ताहर)