शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला वाचविण्यासाठी अपघातात ‘कार’ऐवजी दाखविली ‘रिक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 12:27 IST

खंडपीठाची पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आदींना नोटीस

औरंगाबाद : अपघाताच्या गुन्ह्यात अडकलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला वाचविण्यासाठी पोलिसांनी अपघात करणाऱ्या कारऐवजी रिक्षाने अपघात घडल्याचे दाखवून रिक्षाचालकाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पोलिसांच्या या कृतीविरुध्द दाखल याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. संदीपकुमार सी. मोरे यांनी पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आदींना नोटीस बजाविण्याचा आदेश दिला आहे. सहायक सरकारी वकिलांनी पोलीस अधिकाऱ्यांच्यावतीने नोटिसा स्वीकारल्या. याचिकेवर २९ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. खंडपीठाने वरील अपघाताशी संबंधित सर्व कागदपत्रे मागविली आहेत.

काय होती घटना...ढोरेगाव येथील पेट्रोल पंपासमोर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी एका कारने मोटारसायकलस्वार बाबासाहेब बोराडे यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. बाबासाहेबचे भाऊ पुंजाराम यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अमरजित बाविस्कर या कारचालकाविरुद्ध गुन्हाही दाखल केला. परंतु, न्यायालयात दोषारोपपत्र मात्र रिक्षाचालक रवी काकडे याच्याविरुध्द दाखल केले. पुंजाराम यांनी ॲड. रवींद्र गोरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. ॲड. गोरे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, अपघात करणारा अमरजित पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्यामुळे तसेच अपघातावेळी त्याच्या कारचा विमा नसल्यामुळे, त्याला नुकसान भरपाईपासून आणि गुन्ह्यापासून वाचविण्यासाठी पोलिसांनी बनावट आरोपी उभा केला आहे. पोलिसांनी अशी घटना दाखविली, की बाबासाहेबच्या मोटारसायकलीचा काकडेच्या रिक्षाला धक्का लागला, त्यामुळे मोटारसायकल रस्ता दुभाजकाला धडकली. पलीकडच्या रस्त्यावर नगरकडून येणाऱ्या कारला त्याची मोटारसायकल धडकली.

अपघातग्रस्त दाखविलेली रिक्षा भंगारमधील

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखल करणे गरजेचे असताना ते केले नाही. अपघातग्रस्त दाखविलेली रिक्षा भंगारमधील आहे. काकडे याचा गंगापूरचा पत्ता दाखवला असला तरी, तो तेथे राहत नाही. पंचनाम्यात अमरजितची कार आणि बाबासाहेब याची मोटारसायकल यांच्यात अपघात झाल्याचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे. अमरजितच्या कारचे बंपर तुटलेले व त्याला रक्त लागलेले असल्याचे सिध्द करणारा साक्षीदार उपलब्ध आहे. बनावट आरोपी रवी याने त्याचा निष्काळजीपणा मान्य केला आहे. या सर्व बाबींवरून अमरजितला वाचविण्यासाठीच बनावट आरोपी उभा केल्याचे दिसून येते. ॲड. गोरे यांना ॲड. चंद्रकांत बोडखे, ॲड. स्वप्नील मुळे व ॲड. पल्लवी वांगीकर सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ