रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटले
By Admin | Updated: December 26, 2014 00:15 IST2014-12-26T00:10:22+5:302014-12-26T00:15:36+5:30
औरंगाबाद : रिक्षात बसून चिकलठाण्याकडे येत असलेल्या एका प्रवाशाला रात्री रिक्षाचालक व आधीच सहप्रवासी म्हणून बसलेल्या त्याच्या तीन साथीदारांनी मारहाण करीत लुटल्याची घटना जालना रोडवर घडली.

रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटले
औरंगाबाद : रिक्षात बसून चिकलठाण्याकडे येत असलेल्या एका प्रवाशाला रात्री रिक्षाचालक व आधीच सहप्रवासी म्हणून बसलेल्या त्याच्या तीन साथीदारांनी मारहाण करीत लुटल्याची घटना जालना रोडवर घडली.
घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, रामनगरातील रहिवासी गोविंद बरबडे २३ डिसेंबर रोजी रात्री शेंद्र्याकडे गेले होते. तेथून परत येण्यासाठी ते एका रिक्षात बसले. या रिक्षात आधीच तीन प्रवासी बसलेले होते. केम्ब्रिज चौकाच्या पुढे येताच चालकाने अंधारात रिक्षा थांबविली आणि मग बाजूलाच बसलेल्या तीन सहप्रवाशांनी बरबडे यांना मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल, असा सुमारे १५ हजारांचा ऐवज हिसकावून घेतला. त्यानंतर बरबडे यांना रिक्षातून खाली ढकलून देत आरोपी रिक्षात बसून सुसाट वेगाने निघून गेले. या प्रकरणी लुटारू रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फौजदार वाघ या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.