शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रवाशासोबत अश्लील वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकास बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 14:40 IST

रिक्षाचालकांकडून महिलेसोबत घाणेरडे वर्तन होण्याच्या घटना वाढत आहेत.

ठळक मुद्देरात्रपाळीचे रिक्षाचालक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

औरंगाबाद : लोटाकारंजा येथे जाण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री रेल्वेस्टेशन येथे दोन मुलीसह रिक्षात बसलेल्या महिलेसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकास नागरिकांनी बेदम चोप देऊन वेदांतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याविषयी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली.

शेख असिफ शेख चाँद (२२, रा. नारेगाव) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. वेदांतनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार ३५ वर्षीय महिला नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी आंध्र प्रदेशमध्ये गेली होती. बुधवारी रात्री देवगिरी एक्स्प्रेसने ते सर्व परतले. रेल्वेस्टेशन येथून लोटाकारंजाला जाण्यास तक्रारदार, त्यांच्या दोन मुली एका रिक्षात बसल्या. तर त्यांचे नातेवाईक दुसऱ्या रिक्षातून निघाले. स्टेशन बाहेर काही अंतरावर गेल्यानंतर चालकाने रिक्षा थांबविली आणि सामान सुस्थितीत आहे अथवा नाही, हे पाहतो असे म्हणून त्याने महिलेसोबत अश्लील वर्तन केले. यामुळे महिला घाबरली. मात्र सोबत लहान मुली असल्याने त्यांनी  लगेच जाब विचारला नाही.

पुढे काही अंतरावर गेल्यानंतर त्याने पुन्हा रिक्षा थांबवून तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पीडितेने पतीला फोन केला. यानंतर आरोपीने वेगात लोटाकारंजा गाठून त्यांना सोडून   पसार झाला.महिलेने पतीस हा प्रकार सांगितला. रिक्षा क्रमांक त्यांना माहिती असल्याने त्यांनी लगेच रेल्वेस्टेशन गाठले आणि रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि त्यास चांगलाच चोप दिला. 

रात्रपाळीचे रिक्षाचालक गुन्हेगारी पार्श्वभूमीचेरात्रपाळीत प्रवासी वाहतूक करणारे ७० टक्के रिक्षाचालक नशेत धुंद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्याकडे वाहन  परवानाही नसतो. या रिक्षाचालकांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने रिक्षाचालकांकडून महिलेसोबत घाणेरडे वर्तन होण्याच्या घटना वाढत आहेत. शिवाय रिक्षाचालकांकडून सामान्य प्रवाशांची लूट, खुनासारख्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण