हजारो दिव्यांनी उजळला औरंगाबाद येथील क्रांतीचौक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:05 AM2018-02-19T00:05:42+5:302018-02-19T00:05:52+5:30

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ५ हजार पणत्या, ५० मशाली व लेझर लाईटाने क्रांतीचौक परिसर उजळून निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती करण्यात आलेली रोषणाई लक्षवेधी ठरली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी गर्जना करीत उपस्थित युवकांनी परिसर दणाणून सोडला.

Revolutionaries in Aurangabad | हजारो दिव्यांनी उजळला औरंगाबाद येथील क्रांतीचौक

हजारो दिव्यांनी उजळला औरंगाबाद येथील क्रांतीचौक

googlenewsNext
ठळक मुद्देजयघोषांनी परिसर दुमदुमला : पणत्या, मशाली, लेझर लाईटाने झगमगाट

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ५ हजार पणत्या, ५० मशाली व लेझर लाईटाने क्रांतीचौक परिसर उजळून निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती करण्यात आलेली रोषणाई लक्षवेधी ठरली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी गर्जना करीत उपस्थित युवकांनी परिसर दणाणून सोडला.
जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो युवक-युवतींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती ५ हजार पणत्यांच्या रचनेतून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे दीपाक्षर साकारले. यावेळी ५० युवकांनी मशाली हातात घेतल्या होत्या. नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी लोकांनी क्रांतीचौकातील उड्डाणपुलावरही गर्दी केली होती. यावेळी युवक-युवतींनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष केला... लेसर लाईटिंगमुळे या क्रांतीचौकाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली होती. दुचाकीवर भगवा ध्वज लावून शेकडो युवक ‘ जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष करीत चोहोबाजूने क्रांतीचौकात येत होते. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, अभिजित देशमुख, अनिल मानकापे, रवींद्र काळे, संदीप शेळके, बाळू औताडे, अनिकेत पवार आदी पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
ंशहरात चार ठिकाणी मिरवणूक
जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दुपारी ४.३० वाजता राजाबाजार येथून मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती येथे मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती व सत्कार सोहळ्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल. यात ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, झांज पथके राहतील. तसेच सजीव, निर्जीव देखावे असणार आहेत. शहागंज, सराफा रोड, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, पैठणगेटमार्गे मिरवणूक क्रांतीचौकात पोहोचणार आहे. तेथे रात्री ८ वाजता आतषबाजी करण्यात येणार आहे.
नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघाच्या वतीने शहर शिवजयंती उत्सव समितीतर्फे सोमवारी सकाळी ९ वाजता गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिर चौकातून वाहन रॅली काढण्यात येणार आहे, तसेच सायंकाळी ५ वाजता गजानन महाराज मंदिर चौकातून मिरवणूकही काढण्यात येणार आहे.
सिडको-हडको शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सकाळी ९.३० वाजता सिडको एन-७ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे, तसेच सायंकाळी ५ वाजता टीव्ही सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शेषराव तुपे पाटील यांनी कळविले आहे.

Web Title: Revolutionaries in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.