चाऱ्यासह पाणीटंचाईचा आढावा
By Admin | Updated: August 21, 2014 23:19 IST2014-08-21T21:20:59+5:302014-08-21T23:19:42+5:30
हिंगोली : शहरातील कल्याण मंडपम् येथे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली चारा व पाणीटंचाईसंदर्भात गुरूवारी दुपारी आढावा बैठक घेण्यात आली.
चाऱ्यासह पाणीटंचाईचा आढावा
हिंगोली : शहरातील कल्याण मंडपम् येथे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली चारा व पाणीटंचाईसंदर्भात गुरूवारी दुपारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यात आ. गोरेगावकर यांनी टंचाईचा आढावा घेवून नियोजन करण्याबाबत अधिकाऱ्यांना महत्वपुर्ण सूचना दिल्या आहेत.
व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, कार्यकारी अभियंता यंबडवार, पं.स. सभापती छगन बनसोडे, उपसभापती विनोद नाईक, बीडीओ डॉ. विशाल राठोड, तालुका कृषी अधिकारी राधेशाम शर्मा, अभियंता पी.एम. पाठक आदी उपस्थित होते. त्यात चारा व पाणीटंचाईचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी त्वरीत प्रस्ताव सादर करून ते
तातडीने निकाली काढण्याबाबत
आ. गोरेगावकर यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. दरम्यान हातपंपाच्या दुरूस्तीसाठी आणखी एका वाहनाची मागणी सभापती बनसोडे यांनी केली. प्रास्ताविक तहसीलदार कडवकर तर कारेगावकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)