उपसचिवांकडून शौचालय कामांचा आढावा
By Admin | Updated: January 21, 2017 00:12 IST2017-01-21T00:11:07+5:302017-01-21T00:12:01+5:30
जालना : शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर पालिकेने प्रयत्न करावेत, अशा सूचना नगर विकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी दिल्या.

उपसचिवांकडून शौचालय कामांचा आढावा
जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर पालिकेने ठोस पावले उचलून प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय उभारणीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना नगर विकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनीही शौचालयांची कामे गती करण्याचे आवाहन नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केले.
शुक्रवारी सायंकाळी उपसचिव बोबडे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आदींनी नगर पालिकेत शौचालय बांधकाम तसेच झालेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह स्वच्छता तसेच मालमत्ता विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बोबडे यांनी शहरात झालेली शौचायलयांची किती कामे झाली आहेत, किती प्रलंबित आहेत अनुदान किती वाटप केले याची माहिती घेतली. ३१ मार्च अखेर संपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी जोंधळे यांनीही मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
सुमारे तासभर उपसचिव बोबडे व जिल्हाधिकारी जोंधळे यांनी आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.बोबडे यांनी आत्तापर्यंत अनुदान कसे वाटप झाले अथवा कसे करावे याबाबत मार्गदर्शन सूचना दिल्या. काही त्रुटी असतील त्या विचारण्याचे आवाहनही केले. एकूणच ३१ मार्च अखेर उद्दिष्ट पूर्ण करण्याचे कडक सूचना यावेळी देण्यात आल्या. शहरात सुरू असलेल्या बांधकामाची स्थिती तसेच दर्जाबाबत ही यावेळी बोबडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या. संबंधितांनी अनुदान घेतल्यावर त्याचे बांधकाम केले की नाही याबाबतही चौकशी करून तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.