रेल्वेस्थानकाचा आढावा
By Admin | Updated: July 23, 2016 00:52 IST2016-07-23T00:36:06+5:302016-07-23T00:52:10+5:30
जालना : येथील रेल्वे स्थानकात प्रवांशाना रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा हैदराबाद येथील रेल्वे सेवा सुधारणा गटाच्या पथकांनी शुक्रवारी पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला

रेल्वेस्थानकाचा आढावा
जालना : येथील रेल्वे स्थानकात प्रवांशाना रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा हैदराबाद येथील रेल्वे सेवा सुधारणा गटाच्या पथकांनी शुक्रवारी पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला. तसेच संबधीतांना उपाय योजनांबाबत सूचना दिल्या आहेत.
या पथकामध्ये रेल्वे इन्प्रुमेंट गु्रप हैदराबादचे चेअरमन तथा मुख्य वाणिज्य व्यवस्थापक विनय भास्कर, मुख्य वरिष्ठ अभियंता गोपीनाथ, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.डी नायक यांचा समावेश होता. या पथकांनी शुक्रवारी रेल्वे स्थानक परिसरातील स्वच्छता, विश्रामगृह, दवाखाना, पाणी, कॅन्टीन, प्रवेशद्वार, स्वच्छतागृह, यात्री निवारा, व्हीआयपी विश्रामगृह, तिकीट खिडकी आदींची पाहणी केली. यावेळी जालना स्टेशन मास्टर वळवी यांच्यासह रेल्वेतील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, अधिकारी दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात स्वच्छता करण्यात आली होती.