वाळूज महानगरातील मतदान केंद्रांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:23 IST2019-04-10T23:23:23+5:302019-04-10T23:23:33+5:30
औरंगाबाद व जालना मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक शहानवाज कासिम यांनी बुधवारी वाळूज महानगरातील मतदान केंद्रांना भेटी देवून आढावा घेतला.

वाळूज महानगरातील मतदान केंद्रांचा आढावा
वाळूज महानगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद व जालना मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक शहानवाज कासिम यांनी बुधवारी वाळूज महानगरातील मतदान केंद्रांना भेटी देवून आढावा घेतला.
औरंगाबाद व जालना मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक म्हणून तेलंगणाचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शहानवाज कासिम यांची निवड केली आहे. निवडणूक निरीक्षक कासिम यांच्याकडून मतदार संघातील संवेदनशील केंद्राचा आढावा घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी पंढरपूर, रांजणगाव शेणपुंजी, वडगाव कोल्हाटी आदी भागातील मतदान केंद्र्रांना भेटी देत पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पोलिसांना निवडणुकीसंदर्भात सूचना केल्या.
यावेळी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवडणूकीसाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, संदीप गुरमे, फौजदार लक्ष्मण उंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.