शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘उलटं करा, सुलटं करा... मी नानाच, माझ्याच नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभा निवडणुका’

By स. सो. खंडाळकर | Updated: August 7, 2023 16:53 IST

आधी हे सरकार ईडी (एकनाथ- देवेंद्रचं) होतं. आता ते ईडीए (एकनाथ, देवेंद्र व अजित) झालेलं आहे.

छत्रपती संभाजीनगर : ‘माझे नाव नाना पटोले आहे. ते उलट करा, सुलट करा, नानाच राहणार आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष बदलाच्या या केवळ वावड्या आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका माझ्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील, अशी स्पष्ट ग्वाही रविवारी पत्रपरिषदेत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष बदलणार यात कितपत तथ्य आहे, असे विचारले असता, पटोले यांनी असे आत्मविश्वासपूर्वक उत्तर दिले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही सध्या चालू आहे, हे आम्ही बघायचे कारण नाही, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दुपारी नागपूरहून पटोले यांचे आगमन झाले. सुभेदारी गेस्ट हाउसवर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. नंतर ते शहर महिला काँग्रेसतर्फे क्रांती चौकात आयोजित मणिपूरबाबतच्या निदर्शनात सामील झाले. तेथून पदमपुऱ्यात चर्मकार बांधवांशी संवाद साधण्यासाठी गेले. शहर किसान सेलचे महेंद्र रमंडवाल यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

पत्रपरिषदेत त्यांनी आरोप केला की, नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात डबल इंजिन सरकार असूनही यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला काळे फासले. ते सध्या त्यांच्या बगलबच्च्यांच्या एजन्सीमार्फत नोकरभरती करीत आहेत. यातून पैसे उकळण्याचा त्यांचा धंदा सुरू आहे.सरकारने अद्यापही अवकाळी पावसाने क्षतिग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही. नाही. आधी हे सरकार ईडी (एकनाथ- देवेंद्रचं) होतं. आता ते ईडीए (एकनाथ, देवेंद्र व अजित) झालेलं आहे. कोण आमदार नेमके कुणाकडे, हे विधानसभा अध्यक्षही सांगू शकले नाहीत. या सरकारचं अपयश वाढलं आहे. रोहिणी आयोगाच्या शिफारशीत भावाभावांमध्ये लढवण्याची भूमिका दिसते. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. ते न करण्याचे पाप भाजप करते, असा आरोप पटोले यांनी केला.

त्यांनी सांगितले की, काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा, जनतेचा पक्ष आहे. यांनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा लावला होता. आता यांनाच सत्तेतून मुक्त होण्याची वेळ आलेली आहे. मोदी, शाह संघ प्रचारक आहेत. अधूनमधून फेरफटका मारायला व संघाचा प्रचार करायला महाराष्ट्रात येत असतात. यावेळी डॉ. कल्याण काळे, शेख युसूफ, अनिल पटेल, एम. एम. शेख, नामदेवराव पवार, डॉ, जितेंद्र देहाडे, हमद चाऊस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद