महसूल कर्मचारी संपावर
By Admin | Updated: August 2, 2014 01:43 IST2014-08-02T00:35:15+5:302014-08-02T01:43:57+5:30
हिंगोली : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात हिंगोली जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले असून आज महसूल दिनाच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला नाही.

महसूल कर्मचारी संपावर
हिंगोली : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात हिंगोली जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले असून आज महसूल दिनाच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामांत कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला नाही.
महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. यावेळी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निश्चय संघटनेने केला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हिंगोली जिल्हा कचेरीसह उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले. औंढ्यातही महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
वसमतमध्येही सहभाग
वसमत : महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. वसमत येथील सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कामकाज ठप्प झाले आहे.
वसमत येथील संपात महसूल कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष नरहरी शिंदे, अशोक भोजने, चांदने, मिरमुटे, केजकर, अरब फारोखी यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
कळमनुरीत कामकाजावर परिणाम
कळमनुरी : महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प झाले होते. या आंदोलनात के.एम. वीरकुंवर, व्ही.बी. सेवनकर, शिवाजी पोटे, सुरनर, सिद्धार्थ कोकरे, जया दुभळकर, वहीद पठाण, अनवर अली, विनोद अंभोरे, बी.एस. चव्हाण, मिलिंद वाकळे, प्रमोद खर्जूले, अल्का कोकरे, शिल्पा इंगोले, जाधव, पाटील, शेख अहमद, बंडू संगेकर, बलखंडे, व्यवहारे, जैस्वाल, डुकरे आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)
सेनगावची तहसील कुलूपबंद
सेनगाव : विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने शुक्रवारी सेनगाव तहसीलचे कामकाज पूर्णत: बंद होते. तर विविध विभाग दिवसभर कुलूपबंद होते.
सेनगाव येथील २० महसूल कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे येथील तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णत: बंद होते. तहसीलदारासह, नायब तहसीलदार या प्रमुख अधिकाऱ्यांसह सर्व विभाग दिवसभर कुलूपबंद होते.
या आंदोलनाचा अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कार्यालयीन कामकाजानिमित्त आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. तहसील कार्यालयाचे सेतू सुविधा केंद्रही या आंदोलनामुळे बंद होते.