महसूल-महावितरणमध्ये वसुली ‘वॉर’

By Admin | Updated: March 31, 2016 00:30 IST2016-03-31T00:17:54+5:302016-03-31T00:30:33+5:30

व्ही.एस. कुलकर्णी , उदगीर मार्चअखेरच्या वसुलीसाठी सध्या रस्सीखेच सुरु आहे़ त्यातूनच महसूल विभाग व महावितरणमध्ये बुधवारी कुरघोडीचा खेळ रंगला़

Revenue - Mahavitaran Releases 'War' | महसूल-महावितरणमध्ये वसुली ‘वॉर’

महसूल-महावितरणमध्ये वसुली ‘वॉर’


व्ही.एस. कुलकर्णी , उदगीर
मार्चअखेरच्या वसुलीसाठी सध्या रस्सीखेच सुरु आहे़ त्यातूनच महसूल विभाग व महावितरणमध्ये बुधवारी कुरघोडीचा खेळ रंगला़ थकीत वीज बिलापोटी महावितरणने उपजिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडीत करताच महसूल विभागानेही थकीत अकृषी कराच्या वसुलीसाठी थेट महावितरणच्या विभागीय कार्यालयास सील ठोकले़
उदगीरच्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या अवलकोंडा ३३ केव्ही उपकेंद्राकडे २००७ ते २०१६ या कालावधीतील १४ लाख ५० हजार रुपये अकृषी कर थकित आहे़ यासंदर्भात उदगीर तहसील कार्यालयाकडून काही दिवसांपूर्वी नोटीस पाठविण्यात आली होती़ नोटिसीच्या अनुषंगाने महावितरणने थकीत करापैकी ५ लाख रुपये भरले होते़ दरम्यान, महावितरणनेही त्यांच्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे ७८ हजार, तहसील कार्यालयाकडे ९९ हजार, जळकोट तहसील कार्यालयाकडे २ लाख ४० हजार, अहमदपूर उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे १ लाख व तहसील कार्यालयाकडे ५ लाख रुपयांची थकबाकी निघाली़ यामुळे त्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे.

Web Title: Revenue - Mahavitaran Releases 'War'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.