पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे वारे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 00:21 IST2017-04-08T00:19:58+5:302017-04-08T00:21:59+5:30
जालना : पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आल्याने त्यांच्या बदलीचे वारे वाहू लागले

पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे वारे!
जालना : पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आल्याने त्यांच्या बदलीचे वारे वाहू लागले असून, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात बदली होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जालना पोलीस अधीक्षक पदाचा पदभार ज्योतिप्रिय सिंह यांनी २२ फेब्रुवारी २०१४ रोजी घेतला होता. यापूर्वी कोल्हापूर आणि अहमदनगर येथे त्यांनी काम केले आहे. सिंह यांनी गत तीन वर्षांत अनेक अवघड गुन्हे चांगल्या पद्धतीने हाताळले व त्यांचा तपास गतीने पूर्ण केला. गतवर्षी त्यांची बदली होऊन त्यांच्या जागी परभणीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना रुजू होण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, ऐन वेळी सिंह यांची बदली रद्द करण्यात आली. (प्रतिनिधी)