तरतूद नसतानाही केले पुनर्मूल्यांकन

By Admin | Updated: June 17, 2016 00:41 IST2016-06-17T00:03:11+5:302016-06-17T00:41:04+5:30

विद्यापीठाने हजारो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केले आहे

Revaluation done in absence of provision | तरतूद नसतानाही केले पुनर्मूल्यांकन

तरतूद नसतानाही केले पुनर्मूल्यांकन

नजीर शेख, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्वीकारलेल्या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम (सीबीसीएस) मध्ये उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन (रिव्हॅल्युएशन) आणि पुनर्मोजणी (रिकाऊंटिंग) अशी तरतूद नसतानाच विद्यापीठाने हजारो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केले आहे. याबाबत विद्यापीठाने स्वत:च तयार केलेला नियम मोडला असल्याचे स्पष्ट होत आहे.
एखादी योजना लागू करण्यासंदर्भात विद्यापीठातील विविध अधिकार मंडळ आणि अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे या उदाहरणावरून दिसून येत आहे. विद्यापीठातील विभागांसाठी २०११-१२ या शैक्षणिक वर्षापासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम सुरूकरण्यात आली. त्यानंतर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २०१५-१६ या वर्षापासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू करण्यात आली. महाविद्यालयांना सीबीसीएस लागू झाल्यासंबंधी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या सहीने २० जून २०१५ रोजी परिपत्रकही धाडण्यात आले. या परिपत्रकातील नियम ८८७ मध्ये विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या ग्रेड पॉइंटची माहिती देण्यात आली आहे. याच नियमातील तीन क्रमांकाच्या उपनियमामध्ये पुनर्मूल्यांकन (रिव्हॅल्युएशन) (पान २ वर)
परीक्षा नियंत्रक म्हणतात
यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर परीक्षा विभागाचे प्रभारी नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके म्हणाले की, यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून मागणी होती. त्यामुळे पुनर्मूल्यांकन करण्यासंदर्भात मौखिक चर्चा झाली. त्यामुळे पुनर्मूल्यांकन चालू ठेवण्यात आले.

Web Title: Revaluation done in absence of provision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.