१५ कोटींच्या फायली परत

By Admin | Updated: July 21, 2016 01:16 IST2016-07-20T23:52:21+5:302016-07-21T01:16:43+5:30

औरंगाबाद : मागील वर्षी अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेतील एकही रुपयाचे विकासकाम शहरात झाले नाही. यंदा तरी शहरातील ११५ वॉर्डांमध्ये विकासकामे होतील, अशी अपेक्षा नगरसेवकांना आहे.

Return files of 15 crores | १५ कोटींच्या फायली परत

१५ कोटींच्या फायली परत

औरंगाबाद : मागील वर्षी अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेतील एकही रुपयाचे विकासकाम शहरात झाले नाही. यंदा तरी शहरातील ११५ वॉर्डांमध्ये विकासकामे होतील, अशी अपेक्षा नगरसेवकांना आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाच्या अधीन राहून अनेक विकासकामांच्या फायली तयार करण्यात आल्या. अंतिम मंजुरीसाठी सुमारे १५ कोटी रुपयांच्या फायली आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडे नेण्यात आल्या. आयुक्तांनी या सर्व फायली संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे पाठवून दिल्या. प्रशासनाच्या या भूमिकेवर आता पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.
२०१५ मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांना वॉर्डात काम करण्यासाठी निधी नव्हता. मागील वर्षी अर्थसंकल्प उशिराने तयार करण्यात आला. प्रत्यक्षात अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीची वेळ आल्यावर आयुक्तबदलून गेले. शासनाने प्रभारी आयुक्त सुनील केंदे्रकर यांची नेमणूक केली. त्यांनी अर्थसंकल्प बाजूला ठेवून प्रत्येक वॉर्डाला पाच लाख रुपयांची कामे देण्याचा (पान ५ वर)
शहरातील विविध विकासकामांच्या फायली आपल्याकडे आल्या होत्या. या फायली रद्द केलेल्या नाहीत. लवकरच त्या मंजूर होणार आहेत. मनपाच्या तांत्रिक विभागाने कोणत्या वॉर्डातील किती फायलींना मंजुरी घेतली, याची नोंद ठेवावी म्हणून फायली परत केल्या आहेत. एका वॉर्डात आज दहा लाखांचे काम झाले. पुन्हा त्या वॉर्डात पाच लाखांचे काम झाले. या नोंदी ठेवण्यास सांगितले आहे. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये किती विकासकामे करण्यात आली हे पाहणे सोपे जाईल. सर्वांना समान न्याय देता येईल. प्रशासनाला आर्थिक शिस्त लागेल म्हणून यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त मनपा

Web Title: Return files of 15 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.