निवृत्त सैनिकांचा सत्कार

By | Updated: December 5, 2020 04:06 IST2020-12-05T04:06:28+5:302020-12-05T04:06:28+5:30

शेंद्रा,गंगापूर जहांगीर येथील विष्णू पाटोळे यांनी भारतीय सैन्य दलामध्ये २१वर्षे कर्तव्य बजावत आपल्या देशाची, गावाची आणि परिवाराची मान उंचावण्याचे ...

Retirement of veterans | निवृत्त सैनिकांचा सत्कार

निवृत्त सैनिकांचा सत्कार

शेंद्रा,गंगापूर जहांगीर येथील विष्णू पाटोळे यांनी भारतीय सैन्य दलामध्ये २१वर्षे कर्तव्य बजावत आपल्या देशाची, गावाची आणि परिवाराची मान उंचावण्याचे कार्य करून गावी परतल्याच्या आनंदाने शेंद्रा,गंगापूर गावाने त्यांची जंगी मिरवणूक काढीत जल्लोषात सपत्नीक सत्कार केला. या वेळी सत्कार समितीच्या वतीने माजी सैनिक शिवाजी जाधव, अशोक चोरमोरे यांचाही सत्कार करण्यात आला. विष्णू पाटोळे यांनी मेंढपाळाचे काम करून आपले शिक्षण पूर्ण केले आणि सैन्यात भरती झाले. त्यांनी जम्मू काश्मीर,आसाम, दिल्ली, कोर्से, एन.एस.जी कमांडो, लडाख आदी सीमेवर कर्तव्य बजावले.

(फोटो)

Web Title: Retirement of veterans