कॅथलिक सभेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त निवृत्तांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:03 IST2021-09-05T04:03:02+5:302021-09-05T04:03:02+5:30

संस्थेतर्फे समाजोपयोगी विविध कार्यक्रम राबविले जातात. कोविडच्या काळात औरंगाबाद कॅथलिक धर्मप्रांतातील सर्व आजी-माजी धर्मसेवकांना संस्थेच्या वतीने गृहोपयोगी सामग्री, आर्थिक ...

Retirement on the occasion of the sixth anniversary of the Catholic Assembly | कॅथलिक सभेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त निवृत्तांचा सत्कार

कॅथलिक सभेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त निवृत्तांचा सत्कार

संस्थेतर्फे समाजोपयोगी विविध कार्यक्रम राबविले जातात. कोविडच्या काळात औरंगाबाद कॅथलिक धर्मप्रांतातील सर्व आजी-माजी धर्मसेवकांना संस्थेच्या वतीने गृहोपयोगी सामग्री, आर्थिक मदत आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला औषधी पुरविण्यात आली होती. धर्मप्रांताचे महागुरू बिशप अंब्रोज रिबेलो आणि विकर जनरल फादर डॉ. बेन्नी कालिकत यांचे संस्थेला नेहमी सहकार्य लाभते, असे यावेळी रेव्ह. फादर अनिल पंडित यांनी सांगितले.

यावेळी रेव्ह. फादर अनिल पंडित, संस्थेचे अध्यक्ष एफ.एम. शिनगारे, उपाध्यक्ष एन.के. जाधव, सचिव राजेंद्र दुशिंग, कोषाध्यक्ष प्रकाश पी. बनसोडे, सहसचिव सुनील त्रिभुवन, सभासद के.व्ही. हिवाळे, एस.बी. शिनगारे, राजू पारखे, डॉ. संजयकुमार थोरात, सुरेश माघाडे आणि महिला मोठ्या संख्येने हजर होत्या. कार्यक्रमाचे संचालन अजय हिवाळे यांनी केले.

Web Title: Retirement on the occasion of the sixth anniversary of the Catholic Assembly