निवृत्त पोलीस निरीक्षकाचे घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 04:42 IST2017-08-09T04:42:14+5:302017-08-09T04:42:14+5:30

सिडको एन-३ येथील रहिवासी निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक कटके यांच्या घरात घुसून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख असा ७ लाखांचा ऐवज पळविल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.

 The retired police inspector broke into the house | निवृत्त पोलीस निरीक्षकाचे घर फोडले

निवृत्त पोलीस निरीक्षकाचे घर फोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडको एन-३ येथील रहिवासी निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक कटके यांच्या घरात घुसून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख असा ७ लाखांचा ऐवज पळविल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.
अशोक कटके यांचा एक मुलगा पुण्यात, तर दुसरा मुलगा त्यांच्या सोबत राहतो. तो मुलगाही रक्षाबंधनानिमित्त सोमवारी गावी गेला होता. बेडरूमच्या खिडकीची लोखंडी जाळी काढून मध्यरात्री चोरटे घरात घुसले. बनावट चावीने कपाट उघडून सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी व रोख रक्कम असा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. लॉकरमधील चांदीचे कप, इतर वस्तूंना चोरट्यांनी हातही लावला नाही.

Web Title:  The retired police inspector broke into the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.