शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉक करणा-या निवृत्त मुख्याध्यापकाला बसने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 19:18 IST

औरंगाबाद: कामगारांना कंपनीत घेऊन जाणा-या भरधाव खासगी बसने मॉर्निंग वॉक करणा-या सेवानिवृत्त मुख्याध्यापकास चिरडले. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

औरंगाबाद: कामगारांना कंपनीत घेऊन जाणा-या भरधाव खासगी बसने मॉर्निंग वॉक करणा-या सेवानिवृत्त मुख्याध्यापकास चिरडले. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गारखेडा ते सुतगिरी चौक रोडवरील एका हॉटेलजवळ घडली.पैली वरकी वारचाला (६८, रा.नाथप्रांगण, गारखेडा) असे मृताचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पैली वरकी वारचाला हे जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले आहेत. ते रोज सकाळी नियमित फिरायला जातात. नेहमीप्रमाणे आज सकाळी डोक्यावर मंकी टोपी आणि चष्मा लावून मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. कधी ते विभागीय क्रीडा संकुल येथे तर कधी रस्त्याने फिरत. आज सकाळी ते घरापासून निघाल्यानंतर  सूतगिरणी चौक मार्गे गारखेडा गावपर्यंत आले. यानंतर तेथून वळण घेऊन पुन्हा घराच्या दिशेने निघाले. यावेळी कामगारांना घेऊन जाणा-या भरधाव बसचालकाने त्यांना उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, ते उंच उडवून रस्त्यावर पडले आणि बसच्या चाकाखाली आले. या घटनेत ते घटनास्थळीच गतप्राण झाले.अपघाताची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रस्त्यावर निपचित पडलेल्या पैली यांचा मृतदेह घाटीत दाखल केले. घटना पुंडलिकनगर ठाण्यांतर्गत येत असल्याने पोलिसांनी बस पुंडलिकनगर ठाण्यासमोर नेऊन उभी केली.  याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज म्हणाले की, आरोपी बसचालकाला आम्ही अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ राठोड करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद