दहावीचा निकाल आज

By Admin | Updated: June 5, 2016 23:54 IST2016-06-05T23:45:06+5:302016-06-05T23:54:53+5:30

औरंगाबाद : दहावीच्या परीक्षेचा निकाल ६ जून रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी १ वा. निकाल जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना १५ जून रोजी संबंधित शाळांमधून गुणपत्रिका प्राप्त होईल

Results of tenths today | दहावीचा निकाल आज

दहावीचा निकाल आज

औरंगाबाद : दहावीच्या परीक्षेचा निकाल ६ जून रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी १ वा. निकाल जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना १५ जून रोजी संबंधित शाळांमधून गुणपत्रिका प्राप्त होईल, असे मंडळाच्या विभागीय सचिवांनी कळविले आहे. औरंगाबादमधून ६४ हजार ६६८, बीडमधून ४२ हजार ४०, परभणीमधून २९ हजार ३०, जालन्यातून २९ हजार १४१, हिंगोलीतून १६ हजार ६९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
कौतुक गुणवंतांचे...
आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर होत आहे. गुणवंतांचे कौतुक करणे ही लोकमतची परंपरा आहे. परंपरेनुसार यंदाही या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचे छायाचित्र ‘लोकमत’ प्रकाशित करणार आहे. किमान ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपले छायाचित्र व इंटरनेटवरील निकालाची प्रत आमच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आणून द्यावी.

 

Web Title: Results of tenths today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.