अनुभवी शिक्षकांअभावी विद्यापीठाचे निकाल लांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:05 IST2017-09-13T01:05:41+5:302017-09-13T01:05:41+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा निकाल उशिरा लावण्याची परंपरा यंदाही कामय राखली

अनुभवी शिक्षकांअभावी विद्यापीठाचे निकाल लांबले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा निकाल उशिरा लावण्याची परंपरा यंदाही कामय राखली. यासाठी परीक्षा विभागाने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पात्र व अनुभवी शिक्षकांची कमतरता व अपुरे शिक्षकतेर मनुष्यबळ, अशी दोन कारणे समोर केली आहेत.
परीक्षा विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार, अभ्यासक्रम, परीक्षा, प्रश्नपत्रिका आणि विद्यार्थी संख्या अधिक होती. मात्र, त्या तुलनेत उत्तरपत्रिका तपासणाºया अनुभवी व पात्र शिक्षकांची संख्या पुरेशी नव्हती. तसेच गणित (द्वितीय वर्ष), सिव्हिल इंजिनिअरिंग (द्वितीय व तृतीय वर्ष) आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग (द्वितीय व तृतीय वर्ष) विषयांच्या परीक्षक/नियंत्रकांंची कामगिरी सर्वाधिक सुमार ठरली. मूल्यांकन सादर न केलेल्या परीक्षक/ नियंत्रकांवर कारवाई करण्यात येणार आहे. विद्यापीठामार्फत मागच्या सत्रात घेण्यात आलेल्या एकूण १२७ परीक्षांपैकी केवळ ५५ परीक्षांचे निकाल नियमानुसार ४५ दिवसांच्या आत लागले. त्यापैकी ३६ परीक्षांचे निकाल ३० दिवसांत जाहीर करण्यात आले; परंतु ६८ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विद्यापीठाने ४५ पेक्षा जास्त दिवस घेतले. सुमारे दोन-अडीच महिन्यांचा विलंब केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. वेळेत निकाल न लागल्याने अनेक जण स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीसाठी अपात्र ठरले. अद्यापही बी.ए. व्होकेशनल परीक्षेचा निकाल लागलेला नाही.