कोट्यवधीच्या घरात थकबाकी
By Admin | Updated: November 23, 2014 00:25 IST2014-11-22T23:38:58+5:302014-11-23T00:25:28+5:30
राजेश खराडे , बीड महावितरणची थकबाकी वसुली करण्याची ग्राहकांबरोबर महावितरण कंपनीचीही मानसिकता दिसून येत नाही. कोट्यवधीच्या घरात थकबाकी असतानाही महावितरण कंपनीकडून

कोट्यवधीच्या घरात थकबाकी
राजेश खराडे , बीड
महावितरणची थकबाकी वसुली करण्याची ग्राहकांबरोबर महावितरण कंपनीचीही मानसिकता दिसून येत नाही. कोट्यवधीच्या घरात थकबाकी असतानाही महावितरण कंपनीकडून कोणती वसुली मोहीम राबविण्यात येत नाही. वसुलीकरिता स्वतंत्र विभागही नेमण्यात आलेला नाही.
वसुलीचे काम हे लाईनमनवरील कामगारावरच अवलंबून असते. याकडे सर्व्हे, ग्राहकांची नवीन कनेक्शन, वीज चोरीवर आळा घालणे, जनित्राची दुरुस्ती, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण आणि मिळालाच वेळ तर वसुली केली जाते. त्यामुळे कामाचा अतिरीक्त ताण असल्यानेच वसुली होत नसल्याचे येथील लाईनमनने सांगितले. बीड जिल्ह्यात बीड विभाग व अंबाजोगाई असे दोन विभाग आहेत. बीड विभागात ८५० तर अंबाजोगाई विभागात ८०० कामगार आहेत. भौगालिक रचनेनुसार एका कामगाराकडे ४ गावे व ८ वस्त्याचा कारभार असल्याने वसुलीकडे दुर्लक्ष होत आहे. महावितरणकडून वसुलीकरिता कोणती मोहीम राबवली जात नाही तर वरिष्ठांकडून तगादा लावल्यावर वसुली केली जाते. सध्या बीड विभागाकडे सर्वाधिक थकबाकी असल्याने महिनाभर वसुली मोहिमच राबवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र कामगारांवर कामाचा अरिरीक्त ताण असल्याने वसुलीत सुसुत्रता येत नाही. एकाच कामगारावर ४ जनित्राचे काम केले जाते. एका जनित्रावर सरासरी ८० ते १०० ग्राहकांचा समावेश असतो. ग्राहकांच्या तक्रारी, नवीन कनेक्शन इत्यादी कामाचा ताण येत असल्यानेच वसुलीच्या थकबाकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
कर्मचाऱ्यांवर अतिरीक्त कामाचा भार
कर्मचाऱ्यांवर वसुलीबरोबरच परिसरातील सर्व्हे, नवीन कनेक्शन देणे, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणे, जनित्राची दुरुस्ती करून चार-चार गावांतील वसुली करावी लागत आहे. अतिरीक्त कामाचा भार असल्याने वसुलीत सातत्य राहत नसल्याचे लाईमन यांनी सांगितले.
महावितरण कंपनीकडून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वसुली मोहीम व वीज चोरीला आळा बसण्यासाठी शहरातून व ग्रामीण भागात मोहीम राबवली जात. यामधून वसुलीत वाढ होऊन वीज चोरीलाही आळा बसत होता. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही मोहीम बंद असल्याने थकबाकीत वाढ होत आहे.