वारसा जपण्याची जबाबदारी सर्वांचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:52 IST2017-09-17T00:52:30+5:302017-09-17T00:52:30+5:30
शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके आपली भूषणे आहेत. ही भूषणे जपण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन फातेमा झकेरिया यांनी शनिवारी बीबीका मकबरा येथे केले.

वारसा जपण्याची जबाबदारी सर्वांचीच
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके आपली भूषणे आहेत. ही भूषणे जपण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन फातेमा झकेरिया यांनी शनिवारी बीबीका मकबरा येथे केले.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडळातर्फे १६ ते ३० सप्टेंबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी बीबीका मकबरा परिसरातील आइने महालात
झाले.
या कार्यक्रमाला मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा फातेमा झकेरिया, माजी संचालक डॉ. ए. जी. खान, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एन. एस. वाठोरे, पुरातत्व अधीक्षक डॉ. दिलीप कुमार खमारी, उपअधीक्षक डॉ. शिवाकांत वाजपेयी, मुख्य अभियंता आनंद तीर्थ, एन. सी. एच. पेडिंटलू, डॉ. टी. आर. पाटील, अण्णासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. खमारी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.
आई आपल्या मुलांची काळजी घेते, त्याप्रमाणे आपण स्मारकांची जपणूक केली पाहिजे, या हेतूनेच या पंधरवड्याला ‘वात्सल्य-विरासत’ नाव देण्यात आल्याचे ते म्हणाले. विभागामार्फ त राबविल्या जाणाºया विविध कार्यक्रमांची माहिती डॉ. वाजपेयी यांनी दिली.
स्वच्छता पंधरवड्याबाबत त्यांनी माहिती दिली. ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवायोजना समन्वयक डॉ. टी. आर. पाटील यांचीही भाषणे झाली. प्राचार्य वाठोरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती आवश्यक असल्याचे म्हटले. विद्यापीठाच्या रासेयोतील विद्यार्थ्यांच्या गटाने मकबरा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. कालिका महिला बचत गटाच्या सदस्यांची यावेळी उपस्थिती होती. त्यांचा झकेरिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी एम. आर. शेख, विजय सातभाई, विलीश रामटेके, नीलेश सोनवणे, ए. के. तुरे, नितू बित्रे यांच्यासह कर्मचाºयांची उपस्थिती होती. सहायक पुरातत्वज्ञ डॉ. किशोर चलवादी, रत्नेश कुमार यांनी सूत्रसंचालन केले.