‘शाळा बंद’ला प्रतिसाद
By Admin | Updated: December 9, 2015 23:53 IST2015-12-09T23:41:05+5:302015-12-09T23:53:12+5:30
उस्मानाबाद : खाजगी शिक्षक संस्थांची स्वायत्तता कायम ठेवावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेल्या ‘

‘शाळा बंद’ला प्रतिसाद
उस्मानाबाद : खाजगी शिक्षक संस्थांची स्वायत्तता कायम ठेवावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांकडून प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
संस्थाचालकांचे मुलभूत अधिकार काढून घेणे, शिक्षकांचा शैक्षणिक कामांचा बोजा वाढविणे, २८ आॅगस्टच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था अस्थिर करणे यासारखे अनेक अन्यायकारक निर्णय शासन घेत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्हा पातळीवर संस्था चालक संघटना, मुख्याध्यापक संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघ, मराठवाडा शिक्षक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना आदी संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील साडेतीनशेहून अधिक शाळांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविला. गुरुवारीही सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)