शासनासह प्रतिवादींनी म्हणणे सादर करावे
By Admin | Updated: December 17, 2015 00:16 IST2015-12-17T00:03:40+5:302015-12-17T00:16:20+5:30
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात दाखल पार्टी इन पर्सन जनहित याचिकेत महापालिकेने आरोग्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याचे मान्य केले,

शासनासह प्रतिवादींनी म्हणणे सादर करावे
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात दाखल पार्टी इन पर्सन जनहित याचिकेत महापालिकेने आरोग्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याचे मान्य केले, तर पोलीस आयुक्तांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सविस्तर उपाययोजना सुचविल्या. त्यावर राज्य शासन, महापालिका, बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाने म्हणणे सादर करण्याचे आदेश न्या. आर.एम. बोर्डे व न्या. ए.आय.एस. चिमा यांनी दिले आहेत.
शहरातील रस्त्यांसंदर्भात अॅड. रूपेश जैस्वाल यांनी २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाने प्रशासनाला धारेवर धरले होते. शहरात सर्वसामान्यांसह,