आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
By Admin | Updated: June 30, 2014 00:05 IST2014-06-29T23:48:50+5:302014-06-30T00:05:11+5:30
हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंच व बालविकास मंचच्या सदस्यांसाठी घेण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.
आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंच व बालविकास मंचच्या सदस्यांसाठी घेण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला. रविवारी दोन सत्रात झालेल्या शिबिरात महिला व बालकांच्या विविध आजारांची तपासणी व मार्गदर्शन करून औषधींचे वाटप करण्यात आले.
‘लोकमत’ सखीमंच व बालविकास मंच आणि माधव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अॅन्ड क्रिटीकल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले. माधव हॉस्पिटल येथे झालेल्या शिबिराचे उद्घाटन शल्यचिकित्सक डॉ. सचिन बगडिया व स्त्रीरोग तज्ज्ञ
डॉ. कांचन बगडिया यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नंदकुमार करवा, डॉ. सुधीर भगत, डॉ. नंदिनी भगत, डॉ. अमित शहा,
डॉ. बी.एन. चव्हाण, डॉ. अर्चना सराफ, डॉ. दिनेश मुंदडा, डॉ. नागेश बांगर, डॉ. विशाल पवार, डॉ. राजेश धमणे, डॉ.सोनाली दमकोंडवार,
डॉ. सुमंत नायक, डॉ. सारंग पाठक,
डॉ. पूजा पाठक, डॉ. शिल्पा देशमुख, राजीव राठोड आदी उपस्थित होते.
शिबिरात सखीमंच आणि बालविकास मंच सदस्यांच्या आरोग्याची तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात आली. प्रामुख्याने मुळव्याध, अॅसिडीटी, मासिक पाळी, श्वेतपदर आदी आजारांची तपासणी करून महिलांना सल्लाही देण्यात आला. शिबिरात गर्भवती महिलांना मार्गदर्शन करून औषधींचे वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात बालकांमधील हार्निया, हायड्रोक्सील, हायपोस्पाडीयाझ, दुभंगलेले ओठ, अस्थिरोगांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, बालक आणि महिलांचे दात, कान, नाक, घशाच्या आजारांची तपासणी तज्ज्ञांनी केली. उपस्थित मान्यवर तसेच तज्ज्ञांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
सूत्रसंचालन अर्चना जाधव यांनी केले. माधव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अॅन्ड क्रिटीकल केअर सेंटरने कार्यक्रमाचे प्रायोजक स्वीकारले होते. (वाणिज्य प्रतिनिधी)