सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद
By Admin | Updated: September 3, 2016 00:26 IST2016-09-03T00:15:05+5:302016-09-03T00:26:22+5:30
जालना: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी संपाला जालन्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद
जालना: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी संपाला जालन्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, अशंदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात यावा, रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, कंत्राटीकरण व नैमित्तीक नियुक्ती रद्द करण्यात यावी, अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे, आयकर गणनेसाठी उत्पन्नाची मर्यादी वाढविण्यात यावी, केंद्रा प्रमाणे महागाई भत्ता थकबाकीसह देण्यात यावा, शिक्षणातील विनाअनुदान धोरण रद्द करण्यात यावे, निकषपात्र शाळांना अनुदान देवून शिक्षकांची वेठबिगारी थांबविण्यात यावी, ५ दिवसांचा आठवडा करण्यात यावा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बाल संगोपन रजा मंजूर करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष व्ही. जी. पाटील, एस.एम. जोशी, पठाण याह्या, गणेश कुलकर्णी, व्ही.एल भोरे, पी.बी. मते, एस.एच बोर्डे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)