सिडकोचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:05 IST2021-07-22T04:05:27+5:302021-07-22T04:05:27+5:30
औरंगाबाद : सिडकोचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सिडको प्रशासकाकडे केली. यावेळी मालमत्ता हस्तांतरण, ...

सिडकोचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा
औरंगाबाद : सिडकोचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सिडको प्रशासकाकडे केली.
यावेळी मालमत्ता हस्तांतरण, बांधकाम परवानगी आणि भोगवटा कार्यवाही, लीज होल्डचे फ्री होल्ड करण्यात यावे, अशा विविध मागण्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रशासकाकडे निवेदनाद्वारे मांडल्या. यावेळी शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, प्रभाकर मते, अनिल पोलकर, बाळासाहेब थोरात, बाबासाहेब डांगे, मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल, किशोर नागरे, वीरभद्र गादगे, साहेबराव घोडके, शिवा लुंगारे आदींची उपस्थिती होती.
----–
एन-४ मधील हनुमान मंदिर परिसरातील भूखंड रद्द करा
औरंगाबाद : सिडको एन-४च्या मध्यवर्ती भागात जुने हनुमान मंदिर आहे. या भागात सिडकोने पोलीस स्टेशनसाठी भूखंड दिल्याचे कळते. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा या गोष्टीला तीव्र विरोध असून, शांतता भंग होईल. या ठिकाणी पुरातन बारव असून, गणपती विसर्जन होत असते. या सर्व गंभीर बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नागरिकांना न्याय देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.