सामाजिक न्याय भवनाची वास्तू न्याय देणारी ठरावी
By Admin | Updated: March 12, 2017 23:16 IST2017-03-12T23:13:32+5:302017-03-12T23:16:30+5:30
लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची वास्तू साकारली आहे.

सामाजिक न्याय भवनाची वास्तू न्याय देणारी ठरावी
लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची वास्तू साकारली आहे. या इमारतीच्या छताखाली अनेक सामाजिक न्यायाची कार्यालये येथे थाटली जाणार आहेत. या वास्तूतून प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा. ही वास्तू न्याय देणारी ठरावी, असे मत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा.डॉ. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायक पाटील, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, समाजकल्याणचे अतिरिक्त आयुक्त सदानंद पाटील, उपायुक्त लक्ष्मण वाघमारे, सहायक आयुक्त बी.जी. अरवत यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, न्याय भवनाच्या इमारतीमध्ये सामाजिक न्यायाची विविध कार्यालये थाटली जाणार आहेत. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना द्यावा. शिवाय, त्यांना चांगली वागणूक व सेवा देणे आवश्यक आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्याला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली पाहिजे. राज्य शासन गतिमान आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनानेही त्याच गतीने काम करून लोकांना न्याय द्यावा. या न्याय भवनामध्ये लोकांचे शोषण होता कामा नये. सामाजिक न्याय भवनाच्या अंतर्गत कौशल्य विकास केंद्रही या ठिकाणी स्थापन करू, (अधिक वृत्त हॅलो/२ वर)