राकाँ शहराध्यक्षाचा राजीनामा
By Admin | Updated: November 6, 2016 00:57 IST2016-11-06T00:54:18+5:302016-11-06T00:57:59+5:30
उस्मानाबाद : ऐन पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण वाढली आहे

राकाँ शहराध्यक्षाचा राजीनामा
उस्मानाबाद : ऐन पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण वाढली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी न दिल्यामुळे राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी थेट सोशल मीडियावरून नाराजी जाहीर केली. दुसरीकडे समता नगरमधून मागील वेळी राष्ट्रवादीकून निवडून आलेले नगरसेवक विशाल साखरे यांनीही शनिवारी शिवसेनेमध्ये प्रवेश करुन सेना प्रवेशाची औैपचारिकता पुर्ण केली. देशमुख हे मागील सात वर्षांपासून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून काम करीत होते. यावेळी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी पक्षाकडे आग्रही मागणी केली होती. मात्र, पक्षाने माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने अमरसिंह देशमुख नाराज झाले. अनेक वर्षे पक्षाचे काम करूनही एकही निवडणूक लढविण्याची संधी मिळत नाही. याचे शल्य वेदना देणारे असल्याचे सांगत देशमुख यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, देशमुख यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज ते काढतात की कायम ठेवतात याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, शिवसेनेच्या मेळाव्यात विशाल साखरे यांनीही खा. रवींद्र गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला