अधिग्रहणाचे पाणी गावकऱ्यांना मिळेना !
By Admin | Updated: April 15, 2016 00:45 IST2016-04-15T00:16:39+5:302016-04-15T00:45:02+5:30
भादा : सध्या औसा तालुक्यातील बहुतांश गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ तालुक्यातील हळदूर्ग येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने गावातील कुपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले आहे़

अधिग्रहणाचे पाणी गावकऱ्यांना मिळेना !
गटविकास अधिकाऱ्यांना हळदूर्गकरांचे साकडे
भादा : सध्या औसा तालुक्यातील बहुतांश गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ तालुक्यातील हळदूर्ग येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने गावातील कुपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ परंतु, या अधिग्रहणाचे पाणी गावकऱ्यांना दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी बुधवारी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे़
हळदूर्ग येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पटेल यांचे बोअर अधिग्रहण करण्यात आले आहे़ परंतू, बोअर मालक स्वत:च्या शेतीसाठी पाण्याचा उपयोग करीत आहेत़ नागरिकांना मात्र पाणी देत नाहीत़ त्यामुळे गावातील नागरिकांना माणिक सुरवसे यांच्या विहिरीच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे़ यासंदर्भात बोअरमालकाकडे विचारणा केली असता ते बोअर बंद असल्याचे सांगतात़ त्यामुळे या बोअरचे अधिग्रहण रद्द करावे, अशी मागणी लखणगावचे तलाठी व गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे़(वार्ताहर)