बदलीनंतरही निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोडवेना बीड !

By Admin | Updated: September 19, 2014 01:01 IST2014-09-19T00:34:58+5:302014-09-19T01:01:47+5:30

बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णालय प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ एऩ बी़ पटेल यांची परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे शासन आदेशानुसार बदली झाली आहे़

Resident Medical Officer will not be able to save! | बदलीनंतरही निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोडवेना बीड !

बदलीनंतरही निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोडवेना बीड !


बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णालय प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ एऩ बी़ पटेल यांची परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे शासन आदेशानुसार बदली झाली आहे़ त्यांना कार्यमुक्तीचे पत्रही देण्यात आले़ अद्यापही त्यांनी खुर्ची सोडली नसल्याचा प्रकार समोर आला आहे़
बीड जिल्हा रुग्णालयातील डॉ़ एऩ बी़ पटेल हे वैद्यकीय अधिकारी असून जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख आहेत़ यासह ते जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) चे कामही पाहत आहेत़ शासनाच्या आदेशानुसार त्यांची बदली परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक या पदावर झाली आहे़ त्या अनुषंगाने पटेल यांना ८ सप्टेंबर २०१४ रोजी कार्यमुक्त करण्यात आले आहे़ हा आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी देऊनही त्यांनी अद्याप आपली खुर्ची सोडलेली नाही़ निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यसंपर्क विभागाचा तसेच रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्राचा संपूर्ण कार्यभार डॉ़ एस़ एस़ मोगले यांच्याकडे सुपूर्द करून जिल्हा शल्य चिकित्सकांना अहवाल सादर करावा, बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन त्याचा अहवाल सार्वजनिक आरोग्य विभागाला कळवावा, असे कार्यालयीन आदेशात नमूद करण्यात आले आहे़
मात्र अद्यापही पटेल यांनी त्यांचा कार्यभार सोडलेला नाही़ विशेष म्हणजे कार्यमुक्त होण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले आहेत़ आदेश देऊन दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यांना सूचना का दिल्या नाहीत हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Resident Medical Officer will not be able to save!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.