शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पिण्यासाठी पाणी राखीव; यंदा उन्हाळी पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही

By बापू सोळुंके | Updated: January 31, 2024 12:42 IST

जायकवाडीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी प्रकल्पातून यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) प्रशासकांनी घेतला आहे. जायकवाडीत उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती कडाच्या अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी दिली.

जायकवाडीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सोबतच जालना, छत्रपती संभाजीनगर या शहरांसह अन्य लगतच्या अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना जायकवाडी प्रकल्पातून आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील विविध औद्योगिक वसाहतींना जायकवाडी प्रकल्पातूनच पाणीपुरवठा होतो. गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ५२ टक्के जलसाठा साचला होता. समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विविध धरणांतून मराठवाड्याला पाणी मिळावे, यासाठी प्रखर आंदोलन केल्यानंतर ८ टीएमसी पाणी मिळाले होते. यानंतर जायकवाडीतून रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. आता रब्बीचे आवर्तन २६ जानेवारीपासून सुरू झाले आहे. हे आवर्तन २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. दरवर्षी उन्हाळी पिकांसाठी जायकवाडी प्रकल्पातून ४ आवर्तने दिली जातात. आता प्रकल्पात केवळ ४० टक्के जलसाठा उरल्याने यंदा उन्हाळी पिकासाठी पाणी न सोडण्याचा निर्णय कडा प्रशासनाने घेतला आहे.

गतवर्षी १ लाख ८१ हजार हेक्टर जमिनीचे सिंचनगतवर्षी वर्षभर चांगला पाऊस झाल्याने जायकवाडीमध्ये मुबलक जलसाठा होता. यामुळे गतवर्षी डाव्या कालव्यातून १ लाख ४१ हजार आणि उजव्या कालव्यातून ४० हजार असे एकूण १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र गतवर्षी सिंचनाखाली आले होते. आता उपलब्ध जलसाठ्याचा विचार करून संभाव्य पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन यावर्षी जायकवाडीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येत आहे. उन्हाळी पिकासाठी पाणी सोडले जाणार नाही.- समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा कार्यालय

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा