शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

भिंतीत एटीएम बसविण्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 18:01 IST

बँकांचे रिझर्व्ह बँकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष

ठळक मुद्देशहरातील ६०० पेक्षा अधिक एटीएम केवळ सीसीटीव्हीच्या भरवशावरएटीएमच्या सुरक्षेबद्दल बँक व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा 

औरंगाबाद : एटीएममधील रक्कमच नव्हे, तर अख्खे एटीएम मशीनच चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे बँकांनी त्यांचे एटीएम भिंतीमध्ये बसवावे, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. मात्र, यासंदर्भात अजून कोणतीही माहिती मुख्यालयाकडून आली नाही, असे शहरातील बँकांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

बीड बायपास रस्त्यावरील एसबीआयचे एटीएम घेऊन चोरट्यांनी शुक्रवारी रात्री पोबारा केला. या घटनेमुळे पुन्हा एकदा एटीएम सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बँका, खाजगी बँका, पतसंस्था मिळून शहरात ६०० पेक्षा अधिक एटीएम आहेत. बँकांचे विभागीय कार्यालय, मुख्य कार्यालयात बसविण्यात आलेले एटीएम वगळता इतर एटीएमवर सुरक्षा व्यवस्था नसल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, कॅमेरे असतानाही एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या आहेत, तसेच आता तर चक्क  एटीएमच उचलून नेण्याचा चोरट्यांनी प्रताप दाखवत एटीएमच्या सुरक्षाप्रणालीलाच छेद दिला आहे.

औरंगाबादेतील ही पहिली घटना असली तरी देशात याआधी अनेक एटीएम अशा प्रकारे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. एटीएम चोरीच्या वाढत्या घटनांमुळे अखेर रिझर्व्ह बँकेने महिनाभरापूर्वी नवीन आदेश काढले आहेत. त्याद्वारे सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, त्यांनी सर्व एटीएम मशीन भिंतीमध्ये बसवावेत. मात्र, या आदेशाचे एकाही बँकेने पालन केले नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने एसबीआय व महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी मुख्यालयातून असा कोणताही आदेश प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. मात्र, एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, आम्ही आधीच प्रस्ताव पाठविला होता, त्यानुसार आम्हाला शहरात तीन सीडीएम मशीन भिंतीत बसविण्याला मंजुरी मिळाली आहे.

जनतेचाच पैसा लुटला जातोय देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, देशभरात एटीएम फोडणे किंवा एटीएम चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याचा फटका बँकांना बसत आहे. बँकांच्या एनपीए वाढण्यापैकी हे एक कारण आहे. यामुळे प्रत्यक्षरीत्या बँकेच्या ग्राहकांना नुकसान होत नाही, कारण नंतर नुकसानभरपाई भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँक मोठी रक्कम देते; पण रिझर्व्ह बँक किंवा केंद्र सरकार स्वत:च्या खिशातून पैसे देत नाही. जनतेकडून जमा झालेल्या कराच्या महसुलातूनच हा पैसा दिला जातो. यामुळे चोर अप्रत्यक्षरीत्या जनतेच्या पैशाचीच लूट करीत आहेत. 

एटीएमच्या सुरक्षेबद्दल बँक व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा रिझर्व्ह बँकेने नवीन आदेश देऊन महिना उलटला, पण एकाही बँकेने एटीएम मशीन भिंतीत बसविले नाही. यावर कहर म्हणजे जेथे सुरक्षारक्षक होते त्यांनाही काढून टाकण्याचा सपाटा बँक व्यवस्थापनाने सुरू केला आहे. फक्त सीसीटीव्हीच्या भरवशावर एटीएम सुरक्षित राहू शकत नाही, हे आता सिद्ध झाले आहे. रिझर्व्ह बँकेला आम्ही मागणी केली आहे की, २४ तास शस्त्रधारी सुरक्षारक्षक बँकेत व एटीएमवर नेमण्याचे आदेश बँकांना द्यावेत. - देवीदास तुळजापूरकर, महासचिव, महाराष्ट्र स्टेट बँक एम्लॉईज फेडरेशन 

टॅग्स :atmएटीएमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी