आरक्षण निर्णयाचे जिल्हाभरात स्वागत
By Admin | Updated: June 28, 2014 01:16 IST2014-06-28T00:24:58+5:302014-06-28T01:16:30+5:30
उस्मानाबाद : राज्य मंत्रीमंडळाने शिक्षण व नोकरीत मराठा समाजाला १६ तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे़
आरक्षण निर्णयाचे जिल्हाभरात स्वागत
उस्मानाबाद : राज्य मंत्रीमंडळाने शिक्षण व नोकरीत मराठा समाजाला १६ तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्य शासनाच्या या निर्णयाचे गुरूवारी जिल्हाभरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले़ ठिकठिकाणी फटाके फोडून तसेच पेठे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला़
मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला़ यावेळी विजय पवार, कैलास काकडे, रोहित बागल, मयुर काकडे, अभिजित देशमुख, ओम नाईकवाडी, पंकज पाटील, आशिष पाटील, अग्निवेश शिंदे, जयराज खोचरे, चंद्रजित जाधव, भारत कोकाटे, भारत इंगळे, अनंत जगताप, सुरज साळुंके, गजानन काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, उमेश राजेनिंबाळकर, अभिषेक बागल, सुमित बागल, राहुल बागल, बालाजी साळुंके, नाना घाडगे आदी उपस्थित होते़
साखरेचे वाटप
महिला कृती समितीच्या वतीने साखर वाटून जल्लोष करण्यात आला़ यावेळी शामल वडणे, शीला उंबरे, सविता कोरे, नंदा पुनगुडे, वर्षा कोळगे, ज्योति सपाटे, सुनिता शिंदे, तारामती मोरे, कलावती काळे, उमरावती भोसले आदी महिला पदाधिकारी, युवक उपस्थित होते़
राष्ट्रवादीकडून स्वागत
आघाडी शासनाने इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण दिल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले़ यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर, नगराध्यक्षा रेविता बनसोडे, उपनगराध्यक्ष अमित शिंदे, पालिका गटनेते मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़
मुस्लिम आरक्षण कृती समिती
मराठा, मुस्लिम समाजास शासनाने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाचे मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले़ यावेळी मशायक समीयोद्दीन, कादरखाँ पठाण, गफार काझी, मैनूद्दीन पठाण, निहाल काझी, इलियास पिरजादे, आलीम मौलाना, पाशा पठाण, शाहाजान शिकलगार, सादिक शेख, खलील सय्यद, खलीफा कुरेशी, बिलाल तांबोळी, सलीम शेख, गयास शेख, इब्राहीम शेख, अॅड़उमर मोरवे, अनवर शेख आदी उपस्थित होते़
कळंब शहरात रॅली
मराठा, मुस्लिम समाजास आरक्षण देण्याचा निर्णय झाल्याबद्दल कळंब शहरात मोठ्या जल्लोषात रॅली काढण्यात आली़ यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे, प्रवक्ते अतुल गायकवाड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष सागर बाराते, उपजिल्हाध्यक्ष बालाजी सुरवसे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश धस, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण टेकाळे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गिड्डे, कृष्णा भाकरे, शिवाजी कराळे, सुरेश गायकवाड, दत्ता तनपुरे, मुस्लिम बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक मिर्झा, शुभम राखुंडे, विनोद यादव, अविनाश शिंदे, सनी बोरगे, आकाश चोंदे आदी युवक उपस्थित होते़ दरम्यान, येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामहारी शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब जाधवर, विजयेंद्र चव्हाण, अशोकभाऊ शिंदे, नगर परिषदेतील गटनेते प्रा. श्रीधर भवर, नगरसेवक संजय मुंदडा, युवक तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, बाजार समिती संचालक प्रणव चव्हाण, माजी जि. प. उपाध्यक्ष भारत खोसे, तारेख मिर्झा, सतीश टेकाळे, उत्तम टेकाळे आदींची उपस्थिती होती.
छावा संघटना
तुळजापूर- महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना आरक्षण जाहीर केल्यामुळे कै. आण्णासाहेब जावळे पाटील यांची स्वप्नपूर्ती झाली. त्यामुळे अ. भा. छावा संघटनेने केलेल्या कामाची पावती मिळाल्याने भारतीय छावा संघटनेच्या वतीने तुळजापुरात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जीवनराज इंगळे, महेश गवळी, औदुंबर जामदाडे, कुमार टोले, प्रशांत अपराध अण्णासाहेब क्षीरसागर, प्रशांत इंगळे, दादा भोसले, सोनबा भालेकर, बालाजी टोले, तात्या क्षीरसागर, दत्ता सोमाजी, महेश कापसे, संतोष नाईकवाडी, ओमकार हंगरगेकर, सुहास गायकवाड, लखन शिंदे, राम छत्रे, देवेंद्र औटी, आबा कापसे, आप्पा चोपदार, विशाल कदम, अतूल टोले आदींची उपस्थिती होती.
जिल्हा काँग्रेस कमिटी
तुळजापूर- राज्य सरकारने मराठा समाजास १६ टक्के तसेच मुस्लिम समाजास ५ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी स्वागत केले आहे.