शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

रेल्वेचे आरक्षण ‘हाऊसफुल’; ‘एस.टी.’बरोबर खाजगी बसचाही भाडेवाढीचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 13:37 IST

नोकरदार, व्यावसायिक आणि शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास असलेल्या मंडळींची लगबग सुरू झाली आहे.

औरंगाबाद : प्रकाशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाण्यासाठी आणि दिवाळीच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी नोकरदार, व्यावसायिक आणि शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास असलेल्या मंडळींची लगबग सुरू झाली आहे. यामध्ये सर्वात पहिले प्रवासाचे नियोजन करण्यात आले आहे. परिणामी अनेक रेल्वेचे आगामी दिवसांतील आरक्षण हाऊसफुल झाले आहे. 

शहरात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी आलेले मराठवाड्यातील विविध भागांसह विदर्भ, खान्देशमधील नागरिकांना दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या गावी जाण्याचे वेध लागले आहेत. शिवाय सुट्यांनिमित्त अनेकांनी पर्यटनाचेही नियोजन केले आहे. यासाठी प्रवासासाठी पहिले प्राधान्य रेल्वेला दिले जाते. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण करण्यावर अनेकांनी भर दिला. त्यामुळे सचखंड एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसह विविध रेल्वेगाड्यांचे आगामी काही दिवसांमधील बुकिंग हाऊसफुल झाले आहे.

नंदीग्राम एक्स्प्रेसचे २६ तर देवगिरी एक्स्प्रेसचे २६ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण फुल झालेले आहे. तर सचखंड एक्सप्रेसचे आरक्षण जानेवारीपर्यंत फुल झालेले आहे. इतर रेल्वेचीही अशीच परिस्थिती आहे. दिवाळीत पर्यटनासाठी जाण्याचा अनेकांचा ओढा आहे. यात दक्षिण भारतातील विविध ठिकाणांसह राजस्थान, भूतानला जाण्याकडे अनेकांचा कल आहे, असे टुरिझम प्रमोटर्स गिल्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंतसिंग यांनी सांगितले. 

एसटी’ जादा बसप्रवासासाठी एसटीने जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून जादा बस सोडण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विमान प्रवासाकडे कलपर्यटनाबरोबर धार्मिकस्थळी जाण्याकडेही कल दिसून येत आहे. तिरुपतीला जाण्याचा कल अधिक आहे. त्यासाठी विमानसेवेलाही अनेकांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे हैदराबादला जाणारे विमान आजघडीला दररोज फुल जात असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या फारशी बुकिंग नाही. परंतु आगामी काही दिवसांत बुकिंग वाढेल, अशी अपेक्षा अन्य विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

१५ टक्क्यांपर्यंत भाडेवाढ एस.टी. महामंडळाने ऐन दिवाळीच्या तोंडावर १ ते २० नोव्हेंबरदरम्यान १० टक्के भाडेवाढ क रण्याचा निर्णय घेतला आहे, तर खाजगी बसचीही १५ टक्क्यांपर्यंत भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना भाडेवाढीचा दणका बसणार आहे. खाजगी बसने प्रवास करण्यासाठीही आरक्षण करण्यावर भर दिला जात आहे. खाजगी बसची १५ टक्क्यांपर्यंत भाडेवाढ होईल, असे औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंटचे अध्यक्ष राजन हौजवाला म्हणाले.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादairplaneविमानstate transportएसटी