भोकरदन पालिकेची आरक्षण सोडत
By Admin | Updated: August 5, 2016 00:10 IST2016-08-04T23:55:14+5:302016-08-05T00:10:14+5:30
भोकरदन : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ जुलै रोजी काढलेल्या प्रभागाची आरक्षण सोडत चुकीची असल्याने ती रद्द करून शनिवारी सकाळी ११ वाजता

भोकरदन पालिकेची आरक्षण सोडत
भोकरदन : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ जुलै रोजी काढलेल्या प्रभागाची आरक्षण सोडत चुकीची असल्याने ती रद्द करून शनिवारी सकाळी ११ वाजता नगरपरिषद कार्यालयात प्रभागाची नव्याने सोडत काढण्यात येणार आहे़
भोकरदन नगरपरिषदेमध्ये आठ प्रभाग पाडण्यात आले असून, चार प्रभागामध्ये प्रत्येकी दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. तर एका प्रभागामध्ये तीन सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. पालिकेत २ सप्टेंबर रोजी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढली होती. परंतु ही सोडत निर्देशाप्रमाणे काढली नाही. त्यामुळे सुरवातीलाच आरक्षण सोडत चुकीची असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, कोणीही त्याला आक्षेप घेतला नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व त्यांनी विभागीय आयुक्तांकडे आरक्षणाचा तक्ता सादर करताच, वरिष्ठांच्या लक्षात ही चूक आली. त्यांनी पूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणाची सोडत रद्द करून ६ आॅगस्ट रोजी नगरपरिषद कार्र्यालयात नव्याने सोडत काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ शनिवारी सकाळी आकरा वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे. (वार्ताहर)